Jayesh Chavan Post : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाहून धक्कादायक घटना समोर येत आहेत. कुठे चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार होतं आहे तर कुठे विनयभंग होतं आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. बदलापूरमधील शाळेत चिमुकल्यांबरोबर घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून २० ऑगस्टला बदलापूर नागरिक रस्त्यावर उतरले होते. प्रकरणातील नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी नागरिक करत होते. यावेळी रेलरोको आंदोलन केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर प्रकरण ताजे असतानाच पुणे, अंबरनाथ, मुंबई, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. सातत्याने येणाऱ्या अशा बातम्यांमुळे मराठी कलाकारांमध्येही संतापाची लाट पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळी आपल्या भावना, परखड मतं व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: कोणी लाथाडली भांडी, तर कोणी…, इरिनावरून निक्की आणि वैभवमध्ये कडाक्याची भांडणं; पाहा प्रोमो

हिंदू झोपलाय – मराठी अभिनेता

‘टाइमपास’ चित्रपटातील मलेरिया म्हणजे अभिनेता जयेश चव्हाणने ( Jayesh Chavan ) राज्यातील घडणाऱ्या या घटनांवर उद्विग्न पोस्ट शेअर केली आहे. आनंद दिघेंची आठवण काढत जयेशने पोस्ट लिहिली आहे. दिघेंच्या भूमिकेतील प्रसाद ओकचा फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “आजची परिस्थिती बघितली तेव्हा सर्वात आधी तुमची आठवण आली साहेब”

“आज जर तुम्ही असता ना तर कसलाही विचार न करता त्या नराधमाला कापला असता. आजचा हिंदू तुमचे विचार विसरले. हिंदू झोपलाय, त्याला जागा करायला एक दिघे साहेबच हवेत. साहेब या ओ परत तुमच्या बहिणी कुठंच सुरक्षित नाही…धर्मवारी,” असं जयेशने ( Jayesh Chavan ) लिहिलं आहे. जयेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : लोकांना छळू नको म्हणत डीपीने खास अंदाजात निक्कीला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

Jayesh Chavan Post

हेही वाचा – “अजून किती वेळानंतर या नराधमांना शिक्षा मिळणार…”, अंबरनाथमधील विनयभंग प्रकरणावर संतापली तेजश्री प्रधान, म्हणाली…

दरम्यान, जयेश चव्हाणच्या ( Jayesh Chavan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘टाइमपास’ या चित्रपटानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘35% काठावर पास’, ‘टाइमपास ३’, ‘इपतिर’, ‘दिल बेधुंद’ यांसारख्या चित्रपटात जयेश पाहायला मिळाला. शिवाय तो काही अल्बम साँगमध्ये झळकला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayesh chavan angry post on badlapur sexual assault case pps