मराठी चित्रपट झिम्मा २ ची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ २०२१ साली प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या मनात ‘झिम्मा २’ बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘झिम्मा २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगला कधीपासून सुरुवात होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर आता अखेर ‘झिम्मा २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता निर्माण झाली होती. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दलही मोठी माहिती समोर आली आहे. ‘झिम्मा २’ चे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ‘झिम्मा २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगबाबत घोषणा केली आहे.
सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘झिम्मा २’ चे पोस्टर शेअऱ केलं आहे. या पोस्टवर ‘ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात’ असं लिहिलं आहे सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकरांची मुख्य भूमिका आहे.