‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे अभिनेत्री सायली संजीव घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने चित्रपट माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘बस्ता’, ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’, ‘ओले आले’, ‘झिम्मा २’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सायली महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकली आहे.

गेल्या २ महिन्यांमध्ये सायलीचे ‘झिम्मा २’ व ‘ओले आले’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद दिला. ‘झिम्मा २’ आज ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहांमध्ये दणक्यात सुरू आहे. या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : आयरा खानच्या लग्नातील बाप-लेकीचा सुंदर फोटो रीना दत्ताने केला शेअर; कॅप्शनने वेधलं लक्ष

सायली संजीवर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपला निर्णय चाहत्यांना सांगितला आहे. अभिनेत्री सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. याबद्दल सायली पोस्ट करत लिहिते, “सोशल मीडियापासून लहानसा ब्रेक घेत आहे. लवकरच परत येईन… लव्ह अँड लाइट” सायलीची ही इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

sayali sanjeev
सायली संजीव

दरम्यान, सायलीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रियता मिळवली. यामध्ये सायलीसह अभिनेता ऋषी सक्सेना प्रमुख भूमिकेत झळकला होता. २०१७ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Story img Loader