मराठी मनोरंजनसृष्टीत हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गेल्या काही दिवसांपासून यामधील कलाकार प्रत्यक्ष चित्रपटगृहांना भेट देऊन प्रेक्षकांचा उत्साह वाढवत आहेत. अलीकडेच ‘झिम्मा २’च्या प्रमोशनसाठी या कलाकारांनी पुण्यातील अनेक जागांना भेट दिली. या कलाकारांना भेटण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्साही असल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यात प्रमोशनमधून वेळात वेळ काढत सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग त्यांच्या शाळेत गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ चांदेकर व क्षिती जोग यांचं शालेय शिक्षण ‘सेठ दगडूराम कटारिया इंग्लिश मिडियम हायस्कूल’ या महाविद्यालयातून पूर्ण झालं आहे. या दोन्ही कलाकारांनी शाळेचा वर्ग, आजूबाजूचा परिसर, मैदान आणि उपहारगृहात फेरफटका मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. याचा खास व्हिडीओ सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : अर्जुन ‘असे’ मानणार सायलीचे आभार! ‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवीन प्रोमो आला समोर…

सिद्धार्थ चांदेकर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहितो, “आयुष्यातील पराभव आणि विजयाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण इथे पुन्हा जाऊ शकतो का? आता पुन्हा त्या गोष्टी आठवल्या की, डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत. लहानपणी आपल्याला कशाचीच चिंता नव्हती…ते चिंतामुक्त आयुष्य आपण पुन्हा केव्हा जगू शकतो? एकतर डब्यातलं जेवण जेवायचं किंवा अडीच रुपयांचा गरमागरम वडापाव खायचा. या सगळ्या गोष्टी आठवल्यावर चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटतं.”

हेही वाचा : “मैत्री या शब्दाचा अर्थ…”, सोनाली खरेच्या वाढदिवशी अमृता खानविलकरची खास पोस्ट; म्हणाली, “माझ्या वेडेपणाला…”

दरम्यान, ‘झिम्मा २’बद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये सिद्धार्थ चांदेकरने ‘कबीर’ आणि क्षिती जोगने ‘मिता’ हे पात्र साकारलं आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, रिंकू राजगुरू, सायली संजीव आणि शिवानी सुर्वे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhimma 2 fame siddharth chandekar and kshiti jog visit their school in pune actor shares video on instagram sva 00
Show comments