हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटानंतर आता झिम्मा २ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या २४ नोव्हेंबरला झिम्मा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर, पोस्टर पाठोपाठ “मराठी पोरी…” हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. नुकतंच या गाण्यावर उणे तापमानात एका मुलीने डान्स केला आहे.
झिम्मा २ या चित्रपटातील मराठी पोरी या गाण्यावर अनेक जण रिल शेअर करताना दिसत आहेत. नुकतंच अनुष्का धुमाळ या कॅनडात राहणाऱ्या मुलीने उणे दोन तापमानात साडी नेसून रिल व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “मराठी पोरी दुनियेला दाखवत माज…”, स्त्रियांच्या स्वभावाची खासियत सांगणारं ‘झिम्मा २’ चित्रपटातील पहिलं गाण प्रदर्शित
मराठी पोरी in Canada च्या -2°C मधेही, मराठी पोरी नाचते नाचते आज, झिम्मा २ चित्रपटाला शुभेच्छा. क्षिती जोग, हेमंत ढोमे आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम तुम्हाला कॅनडाहून खूप खूप प्रेम, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. यावर क्षिती जोगने कमेंट करत ‘आहा’ असे म्हणत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच सिद्धार्थ चांदेकरनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, ‘झिम्मा २’च्या पहिल्या गाण्याचे बोल “मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…” असे आहे. या गाण्यात इंदूच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. या गाण्याद्वारे चित्रपटातील प्रत्येक स्त्री पात्राच्या स्वभावाची गोष्ट सांगण्यात आली आहे.
‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.