हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट आज (२४ नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’च्या सीक्वेलला सध्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी झिम्माचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिला. सई ताम्हणकर, अभिजीत खांडकेकर, मिताली मयेकर, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी ‘झिम्मा २’ला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणाऱ्या अंकुश चौधरीने सुद्धा ‘झिम्मा २’ पहिल्याच दिवशी पाहिला. चित्रपटात इंदू डार्लिंगच्या वाढदिवसाला गेलेल्या सात बायकांची कथा अंकुशला सुद्धा खूपच भावली. यामध्ये निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, सायली संजीव, रिंकू राजगुरू, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : छोट्या पडद्याची लाडकी सून पुन्हा नंबर १! TRPच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’चं वर्चस्व कायम, ‘या’ आहेत टॉप १० मालिका

“झिम्मा २’ कमाल आणि धमाल अविष्कार…सगळ्याजणी एकापेक्षा एक… हसवतात, रडवतात सुद्धा…आणि शेवटी खूप काही सांगून जातात.. खूप प्रेम…” अशी पोस्ट अंकुश चौधरीने या चित्रपटासाठी शेअर केली आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर केल्यावर चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोगने त्याचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : BB 17 : ‘बिग बॉस’च्या घरात येणार सेलिब्रिटींचा लाडका ओरी! पहिल्याच दिवशी सलमान खानने केली ‘अशी’ थट्टा, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अंकुश चौधरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या शाहीर साबळे चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. लवकरच तो छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री विदुला चौगुलेबरोबर ‘महादेव’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय आता ‘झिम्मा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो याकडे मराठी कलाकारांसह प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhimma 2 movie review actor ankush chaudhari shares special post for film and praised actors sva 00