बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. २०२१ साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता लवकरच ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षकांमध्ये या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळालं पत्ररुपी बक्षीस, म्हणाली “चित्रपट प्रदर्शनापूर्वीच…”

“पुन्हा झिम्मा” असे गाण्याचे बोल आहेत. अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. या गाण्याला वैशाली सामंत, अपेक्षा दांडेकर, अमितराज यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी ‘झिम्मा’मधील सगळीच गाणी सुपरहिट झाली होती. त्यामुळे आता ‘झिम्मा २’ मधील गाण्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.