हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. उद्या शुक्रवारी २४ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, आणि पोस्टरला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे दिसत नसल्याने काही चाहते नाराज झाले आहेत. मात्र आता त्या दोघी या चित्रपटात का नाही, याचे कारण समोर आलं आहे.

‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील कलाकारांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी होऊन दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी हेमंत ढोमेला ‘झिम्मा २’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले का नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिलं.

Harbhajan Singh statement on MS Dhoni and Rohit Sharma
‘…म्हणून धोनीपेक्षा रोहितची नेतृत्त्व शैली आवडते’, हरभजन सिंगने सांगितले कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
raj kundra on riya barde matter
बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे प्रकरणात नाव आल्यावर राज कुंद्रा म्हणाला, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की…”
Manoj Bajpayee on being stereotyped as middle class No director could think of me as a rich guy experts share ways to deal with rejection
“कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा
soham shah tumbbad
“मी ‘तुंबाड’साठी सात वर्षं दिली”, अभिनेता सोहम शाहचे वक्तव्य; आमिर खानचा उल्लेख करत म्हणाला, “माझं वय वाढत होतं; पण…”
Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
IND vs BAN Rohit Sharma Hits Shubman Gill on His Jaw Video Viral
VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?
Shah Rukh Khan And Archana Puran
“… म्हणून यश जोहर शाहरुखला ओरडले”, अर्चना पूरन सिंहने सांगितली ‘कुछ कुछ होता है’च्या शूटिंगची आठवण; म्हणाली, “तो खूपच सभ्य…”

हेमंत ढोमे काय म्हणाला?

‘झिम्मा २’ या चित्रपटात सोनाली आणि मृण्मयी का नाही, यामागचं थेट कारण मी तुम्हाला सांगतो. सोनाली आणि मृण्मयी या पात्रांचं पुढे काय होणार याचा मी विचार करत होतो. दुसऱ्या भागाची कथा मी करत असताना सोनाली (मैथिली) च्या पात्राचे मला उगाचच ओढून ताणून काही करायचं नव्हतं. झिम्माच्या पहिल्या भागात त्याचा गोड शेवट आम्ही दाखवला होता. निखिल मैथिलीला मारहाण करतो, असं काही मला त्यात दाखवायचं नव्हतं. मला उगाचच हवा भरायची किंवा पाणी भरायचं असं काही त्या पात्रामध्ये करायचं नव्हतं.

तसेच रमा हे मृण्मयीचं जे पात्र आहे, त्यात ती पहिल्या भागात मूल होणार असं सांगत असते. त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहिलात तर तुम्हालाही हे नक्की कळेल. त्याबरोबरच जर प्रेक्षकांनी ‘झिम्मा २’ वर भरभरुन प्रेम केलं आणि आम्ही जर तिसरा भाग बनवला तर त्या पुन्हा दिसतीलही, असे वक्तव्य करत हेमंत ढोमेने ‘झिम्मा ३’ या चित्रपटाचे संकेतही दिले.

दरम्यान ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस, नवीन ट्रीपचे प्लॅनिंग आणि एक सरप्राईज असा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकत आहेत. त्याबरोबरच यात सिद्धार्थ चांदेकरही पाहायला मिळत आहे.