हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक हिंदी तगडे चित्रपट असले तरी ‘झिम्मा २’ बक्कळ कमाई करताना दिसत आहे. निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर अशी तगडी कलाकार मंडळी असलेला ‘झिम्मा २’ सुपरहिट ठरला आहे. अशा या सुपरहिट चित्रपटातील अभिनेत्रींना २०२३मध्ये मागे काय सोडायला आवडेल? जाणून घ्या…

आज २०२३ या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. नव्या उत्साहात, नव्या योजनेसह प्रत्येक जण २०२४मध्ये पदार्पण करणार आहे. त्याचंनिमित्ताने ‘झिम्मा २’मधील अभिनेत्री २०२३मध्ये काय त्यांना सोडायला आवडेल? याविषयी बोलल्या.

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Cm Devendra Fadnavis in loksatta events
‘वर्षवेध’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; स्पर्धा परीक्षांचा ‘वाटाड्या’ पूर्णपणे नव्या स्वरूपात
Grammy Awards 2025 Winners List Beyonce to Shakira who won what
Grammy Awards 2025 मध्ये Beyonceचा जलवा, शकिरासह ‘हे’ कलाकार पुरस्काराचे ठरले मानकरी, वाचा विजेत्यांची यादी
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Union Budget 2025 Stock Market Trend
Budget 2025: अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण
Budget 2025 News
Budget 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!

हेही वाचा – “ती गेली…”, अभिनेता आस्ताद काळेच्या आईचं निधन, भावुक पोस्ट करत म्हणाला…

‘रेडिओ सीटी मराठी’ या रेडिओ चॅनेलशी बोलताना सर्वात आधी सुचित्रा बांदेकर यांना विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या की, मागे काही ठेवायचं नाही. सगळं घेऊन पुढे जायचं आहे. तर क्षिती जोग म्हणाली, “२०२३मध्ये मागे एवढंच ठेऊन जाणार आहे, कदाचित आपलं काही चुकलं असेल ते आणि त्यातून शिकून, विसरून, नवीन होपफूल जगायचं आहे. ‘झिम्मा’ने मला ते शिकवलंय. आयुष्य सुंदर आहे, आशादायी आहे. त्यामुळे आशा अजिबात गमावू नये. जे २०२३मध्ये नाही करता आलं, ते २०२४मध्ये करू.”

हेही वाचा – “बिचारा नवरा एकही…” सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली, “तुम्हाला…”

तसेच पुढे रिंकू राजगुरू आणि सायली संजीव बोलली. रिंकू म्हणाली, “मागे काहीच ठेवायचं नाहीये. सगळं घेऊन फिरायचं आहे. प्रवाह बरोबर वाहत जायचं आहे”. त्यानंतर सायली संजीव म्हणाली, “मागे काही ठेवणार नाही. जे माझ्याकडून घडतं नव्हतं, कुठल्या ना कुठल्या कारणाने अडकलं होतं, ते २०२३मध्ये सुरू केलंय. त्यामुळे आता जे सुरू केलंय ते २०२४मध्ये पूर्ण करायचं आहे.”

Story img Loader