राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी ( २ फेब्रुवारी ) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आदी मुद्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कवितेतून आपलं मत मांडलं. मोदी सरकारने केवळ स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे रामलल्लांची अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्याचा आरोप त्यांनी या कवितेतून केला. सध्या अमोल कोल्हेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल कोल्हेंच्या सभागृहातील कवितेवर राजकीय क्षेत्रासह मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया आल्या आहेत. अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे याने अमोल कोल्हेंचा व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन नवऱ्यासह पोहोचली कोकणात! दाखवली सासरच्या घराची झलक, पाहा फोटो…

“आपला विरोध असू शकतो, आपला पाठींबा सुद्धा…काही मतं आपल्याला यांची पटतात.. काही त्यांची… काही गोष्टी पटत नाहीत म्हणून विरोध, काही पटतात म्हणून कौतुक सुद्धा! यालाच लोकशाही म्हणतात! मुद्देसूद पध्दतीने, शालीनतेने आपलं मत मांडता येतं आणि मनं जिंकता येतात! वाह, वाह!” अशी एक्स पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने अमोल कोल्हे यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनातील व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : “माझं दिसणं, बोलणं, रंग, उंची…”, जुई गडकरीने सांगितला इंडस्ट्रीमधील अनुभव; बॉडी शेमिंगचा उल्लेख करत म्हणाली…

अमोल कोल्हे यांच्या कवितेतील काही ओळी

चल पडे हम अयोध्या की ओर रामलल्ला के दर्शन की आस लगाए, जो सामने नजारा देखा वो देख कर दंग रह गए, वो तीन मंजिले ४०० खंबे- ३२ सिडियाँ, जय श्रीराम का नारा लगाते हुए हम सिडियाँ चढने लगे, रामलल्ला से क्या गुहार लगाए ये सोचने लगे, पहली सीडी पर याद आई महंगाई, दुसरी पर देश में बढती बेरोजगारी, तिसरी पर पत्रकारिता की चरण चुंबकता, चौथी पर सेंट्रल एजन्सी की संदिग्ध भूमिका, हर सिडी पर कुछ ना कुछ याद आ रहा था, कही १५ लाख का जुमला, कही किसानों का आक्रोश था, कही महिला कुस्तिगरों की वेदना थी, कही सालाना २ करोड रोजगारों का वादा था, कही बढती सांप्रदायिकता थी, तो कही चुनिंदा पुंजीपतीयों पर मेहरबान हमारी सरकार का चेहरा था..

दरम्यान, हेमंत ढोमेने शेअर केलेल्या या एक्स पोस्टवर नेटकऱ्यांनी “हेमंत भाऊ अगदी बरोबर…”, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारतीय संविधानाने दिलेल्या सुवर्ण अधिकारांपैकी एक अधिकार.”, अशा कमेंट्स करत आपलं मत मांडलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhimma fame director hemant dhome shares video of mp amol kolhe sva 00
Show comments