रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांमध्ये ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यावरच यामधील हिंसा, बोल्ड सीन्स याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. एकीकडे चित्रपटावर जबरदस्त टीका होत असताना दुसरीकडे अनेकांनी चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. रणबीर, रश्मिका, अनिल कपूर यांच्याप्रमाणे ‘अ‍ॅनिमल’मध्ये बॉबी देओल, उपेंद्र लिमये आणि तृप्ती डिमरीची एन्ट्री चर्चेचा विषय ठरली.

उपेंद्र लिमयेंनी यामध्ये फ्रेडी पाटील या रणबीर कपूरला शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका केली आहे. त्यांची एन्ट्री झाल्यावर सिनेमागृहांमध्ये एक वेगळाच माहोल तयार होत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एक दिग्गज मराठी कलाकाराने बॉलीवूड गाजवल्यामुळे सध्या उपेंद्र यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पण, फारच कमी जणांना माहितीये की, उपेंद्र लिमयेंप्रमाणे रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये एका मराठी अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ही अभिनेत्री कोण आहे? जाणून घेऊया…

mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Govinda wanted to marry neelam kothari
‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात सुनीताशी मोडला होता साखरपुडा अन्…
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
kiran rao
ऑस्करमध्ये भारतीय महिलांचा जलवा; किरण रावच नव्हे, तर ‘या’ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही मिळाली होती एन्ट्री
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
allegations on Arindam Sil
दिग्दर्शकानं मांडीवर बसवून बळजबरी किस केलं; अभिनेत्रीचा आरोप

हेही वाचा : हेमंत ढोमे क्षिती जोगला ‘पाटलीण’ या नावाने का हाक मारतो? खुलासा करत म्हणाला, “लग्नानंतर…”

‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर गंभीर आजाराशी झुंज देत असताना त्याची मानसोपचारतज्त्र म्हणून या मराठी अभिनेत्रीने चित्रपटात एन्ट्री घेतली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून ‘चि. व चि. सौ का’, ‘झिम्मा’ ( २०२१ ), येरे येरे पैसा २, ‘चिंटू’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी मृण्मयी गोडबोले आहे. ती चित्रपटात रणबीरला मानसिक सल्ला देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात मृण्मयी रणबीरला कशी मदत करणार? रणबीर तिचा सल्ला ऐकणार की नाही? या गोष्टी प्रेक्षकांना चित्रपटात सविस्तरपणे पाहायला मिळतील.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी उपेंद्र लिमयेंनी दिलेला नकार; किस्सा सांगत म्हणाले, “संदीप रेड्डी वांगाने स्वत:हून मला…”

mrunmayi godbole
अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकली मृण्मयी गोडबोले

दरम्यान, मृण्मयी गोडबोलेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. याशिवाय तिने युट्यूबवरील अनेक लोकप्रिय सीरिजमध्ये देखील काम केलेलं आहे. मृण्मयी बहुचर्चित झिम्मा चित्रपटात रमा लेलेच्या भूमिकेत झळकली होती. सध्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात तिने साकारलेल्या डॉक्टरांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.