बहुप्रतिक्षित ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. या चित्रपटाने सर्वांच्याच मनात एक वेगळेचं स्थान निर्माण केले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता अनेक प्रेक्षकांना लागली होती. अखेर ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वेही झळकणार आहेत. त्यांचे एक पोस्टरही समोर आले आहे.

‘झिम्मा’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्री झळकल्या होत्या. नुकतंच ‘झिम्मा २’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. या नव्या पोस्टरवर सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग यांच्याबरोबर रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकत आहेत. त्याबरोबरच यात सिद्धार्थ चांदेकरही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटातून सोनाली कुलकर्णी, मृण्यमी गोडबोलेची एक्झिट? नव्या पोस्टरमुळे चर्चांना उधाण

Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”
Ramdas Athawale
Ramdas Athawale : अमित शाह यांच्या ‘त्या’ विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस जाणूनबुजून…”
Amit Shah Controversy
“अमित शाहांनी राजीनामा द्यावा”, डॉ. आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर खरगेंची मागणी; काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन; मोदींकडून बचाव
Shatrughan Sinha slams Mukesh Khanna
“हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”
Nagpur issue of Massajog Sarpanch Santosh Deshmukhs murder case Dhananjay Munde
Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय का? धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

या चित्रपटात रिंकू राजगुरु झळकणार हे पाहिल्यावर अनेक चाहते कमेंट करत विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टरवरील पोस्टवर एकाने कमेंट केली आहे. “मी अजून प्रतीक्षा करु शकत नाही. मी आशा करतो की रिंकू राजगुरु या चित्रपटाची मज्जा घालवणार नाही”, असे एकाने म्हटले आहे.

त्यावर सिद्धार्थने “नाही, असे अजिबात होणार नाही. तिने कडक काम केलं आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ही कमेंट सध्या व्हायरल होत आहे.

jhimma 2 siddharth chandekar

आणखी वाचा : “दुसरं लग्न कधी करणार?” तेजस्विनी पंडित म्हणाली, “माझ्या आयुष्यात पुरुष…”

दरम्यान ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस, नवीन ट्रीपचे प्लॅनिंग आणि एक सरप्राईज असा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग यांच्याबरोबर रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकणार आहेत. यात रिंकू आणि शिवानी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader