गेल्या अनेक दिवसांपासून विविध विषयांवर मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. त्यात आता आणखी एक थरारक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला.
या चित्रपटाच्या टिझरची सुरुवात घनदाट जंगलाने होते. त्यानंतर विविध कलाकारांच्या पहिल्या लूकची झलक पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच या कलाकारांच्या डोळ्यात भीतीही दिसत आहे. या टिझरच्या शेवटी वाघाच्या एका पायाचा ठसाही पाहायला मिळत आहे. देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं, असा जबरदस्त डायलॉगही यात पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “वर्षा बंगल्यावरुन निघालो आणि वेगळ्याच रस्त्याने…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी एकत्र रावसाहेब या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील रहस्यमय गोष्टीवरून ‘रावसाहेब’बद्दलची उत्कंठा ताणली गेली आहे.
आणखी वाचा : “मला अजूनही हे घर…” सई ताम्हणकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “उद्या…”
‘रावसाहेब’ चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. तर अक्षय बर्दापूरकर, संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.