‘तुकाराम’, ‘काकण’, ‘पक पक पकाक’, ‘नाळ २’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नटसम्राट’, ‘पोस्टर गर्ल’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘घडले बिघडले’, अशा अनेक हिंदी मराठी चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी(Jitendra Joshi) हा होय. आता मात्र कोणत्या चित्रपटामुळे नाही तर अभिनेता त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या लहानपणीचा किस्सा सांगितला आहे.

जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो

जितेंद्र जोशीने नुकतीच अभिनेता श्रेयस तळपदेच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. मुलाखतीच्या सुरुवातीला श्रेयसने जितेंद्रला उद्देशून म्हटले, या मुलाखतीत आजपर्यंत तुझी जी बाजू आम्हाला कळलीच नाहीये, आपण त्याबद्दल बोलणार आहोत. यावर जितेंद्र जोशीने म्हटले, “अशा अनेक बाजू असतात, घरी आई-वडिलांनादेखील माहीत नसतात, त्या मित्रांना माहीत असतात.”

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Deepti Devi
घटस्फोटानंतर पुन्हा रिलेशनशिपचा विचार केला नाहीस का? दीप्ती देवी म्हणाली, “मला परत स्वत:ला…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Israel-Hezbollah War:
Israel-Hezbollah War: खजिना सापडला! हसन नसरल्लाहच्या बंकरमध्ये सापडले ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कम; इस्रायलचा मोठा दावा

तुझ्याबाबतीत कुठली गोष्ट आहे? असे श्रेयसने विचारताच जितेंद्रने म्हटले, “आपण केलेली पहिली जी चोरी असते, अर्थात ते मी घरी सांगितलं नव्हतं पण कळलं. मी लहान असताना बच्चन साहेबांचा फोटो चोरला होता. मित्रांबरोबर पोहायला गेलो होतो. एका दुकानात ‘दिवार’ चित्रपटातील बच्चन साहेबांचा फोटो होता. मी विचारलं, किती रुपयाला आहे, तर त्यावेळेला तो एक रुपयाला होता. मित्र म्हणाला, काही नाही रे, बघत राहायचं, दुकानदाराचं लक्ष नसेल तर लगेच काढून घ्यायचा. तर तोपर्यंत कधी चोरी केली नव्हती. विचार केला की चांगली कल्पना आहे. तो माणूस दुसरीकडे बघत होता, मी लगेच तो फोटो काढला. त्या माणसाने बघितलं. तो म्हणाला, अरे काय करत आहेस? मी तो फोटो घेतला आणि पळालो, खूप पळालो घराच्या दिशेने. बघितलं तर तो माणूस कुठे दिसेना. घरी आलो आणि सांगितलं, नीलेश नावाच्या मित्राने दिला आहे. घरचे म्हटले अरे वाह, चांगला फोटो आहे.

हेही वाचा: Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”

“घरी गरिबीच होती. वाड्याच्या वरच्या मजल्यावर मी दाखवायला गेलो की, बघा मला फोटो मिळाला. तितक्यात खाली मला जोरजोरात आवाज ऐकू यायला लागले. मला काय माहीत तो मला ओळखतो. वरून बघितलं तर मला दिसायला लागलं की आईची चप्पल, मामाचा बेल्ट आणि त्या माणसाने सांगितलं, त्यानंतर जो मार खाल्ला आहे मी; ती पहिली चोरी माझ्या आयुष्यातली. त्यानंतर मी तिथेच चोरी करण्याचं थांबवलं”, अशी आठवण जितेंद्र जोशीने सांगितली आहे.