मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार अलीकडच्या काळात सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. सोशल मीडिया पोस्टद्वारे हे कलाकार आपली मतं चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. सध्या अभिनेता जितेंद्र जोशीने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो नेहमीच त्याच्या कविता व लेखणीच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर भाष्य करतो. त्याने नुकतीच वृक्षतोडीसंदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

जितेंद्र जोशी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतो. ‘पाणी फाऊंडेशन’, ‘नाम’ यांसारख्या संस्थांसाठी त्याने काम केलंय. त्याच्या कविता-मुलाखती ऐकून त्याला निसर्गाविषयी वाटणारी आपुलकी प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे महामार्ग निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीबाबत जितेंद्रने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

हेही वाचा : Video: सईचं सरप्राइज ते मुक्ता-सागरचा संगीत सोहळा; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढे काय घडणार पाहा…

अभिनेता लिहितो, “महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल करणाऱ्या लोकांना आपल्या पुढच्या पिढ्या गुदमरताना दिसत नाहीत. झाडांची अमानुष हत्या होऊ देणारे आपण सुद्धा निर्वंश होऊन मारून टाकले जाणार आहोत. आताच आपापल्यासाठी डांबर तयार ठेवू त्याच रस्त्यांखाली झाडांच्या मृतदेहासोबत झोपी जाण्यासाठी.” त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

जितेंद्र जोशीप्रमाणे अलीकडे बरेच मराठी कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. यापूर्वी कलाविश्वातील अनेकांनी रस्त्यावरील खड्डे, वाढणारं प्रदूषण, मुंबईतील वाहतूक कोंडी, नाट्यगृहांची दुरावस्था या सामाजिक मुद्द्यांवर आपली मतं मांडली होती.

jitendra joshi
जितेंद्र जोशी

हेही वाचा : “नशीब काढलं…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेते अन् सुपरस्टार धर्मेंद्र यांची ‘अशी’ झाली पहिली भेट!

दरम्यान, जितेंद्र जोशीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘गोदावरी’ चित्रपटात त्याने निशिकांत देशमुख ही व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नाळ २’ चित्रपटात तो झळकला होता.