रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटाचे सर्वच शो सध्या हाऊसफुल असलेले पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनाही भुरळ घालायला हा चित्रपट कमी पडला नाही. निर्माता करण जोहर याने आता एक पोस्ट लिहित रितेशचं कौतुक केलं आहे.

करणने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘वेड’ चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं. हे पोस्टर शेअर करत त्याने रितेशसाठी एक मोठी पोस्ट लिहिली. त्याने लिहिल, “आम्ही गेले २० वर्ष एकमेकांचे मित्र आहोत. आम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यापलीकडे आमची मैत्री आहे. आमच्या पहिल्याच भेटीत मी त्याच्याशी जोडला गेलो. त्याचा चांगुलपणा, मोठं मन, त्याचा प्रेमळपणा हे त्याचं कारण. सर्वांना आवडेल असाच तो सुरुवातीपासून होता.”

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

आणखी वाचा : Video: ‘सैराट’ चित्रपटाचा विक्रम मोडणाऱ्या ‘वेड’ची आर्चीला भुरळ, रिंकू राजगुरूचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुढे तो म्हणाला, “रितेश हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे, पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं. त्याला कायमच मराठी चित्रपटांसाठी खंबीरपणे उभं राहताना मी पाहिलेलं आहे आणि मराठी चित्रपटांबद्दल त्याला प्रचंड अभिमान आहे. आज त्याने हे सिद्ध केलं आहे की, तो फक्त उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेताच नाही तर एक इतिहास रचणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. माझा उर अभिमानाने भरून आला आहे. रितेश आणि जिनिलीया यांच्या खऱ्या आयुष्यातही तसाच परिकथेसारखा रोमान्स आहे जो चित्रपटात सुंदरपणे दाखवण्यात आला आहे. लव्ह यू बोथ..”

हेही वाचा : अभिषेक बच्चनलाही रितेश-जिनिलीयाने लावलं ‘वेड’, म्हणाला, “तुम्ही दोघांनी…”

करणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत रितेशचं कौतुक करत आहेत. तसंच अनेकांनी या चित्रपटाचं कमेंट्स सेक्शनमध्येही कौतुक केलं आहे. ११ दिवसात या चित्रपटाने ३५ हून अधिक कोटींची कमाई केली. तसंच ५.७० कोटींचा गल्ला जमवत ‘एका दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट’ हा सैराटच्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला. तसंच हा रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

Story img Loader