सुप्रसिद्ध मराठी गायक व संगीतकार अवधूत गुप्ते सध्या त्याच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमुळे चर्चेत आहे. आपल्या शोमध्ये राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत अशा दिग्गजांच्या मुलाखती घेणाऱ्या अवधूत गुप्तेने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने करीना कपूरबद्दल एक खुलासा केला आहे.
‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्याने स्थानिकांविरोधात अलिबाग पोलिसात दिली तक्रार, कारण…
‘तुझा आणि करीना कपूरचा काहीतरी संबंध असल्याचं कळालं, ते खरं आहे का?’ असा प्रश्न अवधूत गुप्तेला विचारण्यात आला. त्यावर अवधूतने उत्तर देताना करीनाचा ढोबळी असा उल्लेख केला. “संबंध नाही रे बाबा. माझा तिच्याशी कधीच संबंध आला नाही, पण ती माझ्या वर्गात परीक्षा द्यायला बसायची, एवढाच काय तो संबंध,” असं म्हणत अवधूत हसू लागला.
कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
करीनाला प्रत्यक्षात बघितल्यावर काय वाटायचं, असं विचारलं असता अवधूत ‘मराठी किडा’शी बोलताना म्हणाला, “त्या सर्व पेपरांमध्ये मी नापास व्हायचो. मी पेपर लिहित असताना शेजारच्या बाकावर ती बसली असेल तर काय होणार. त्यावेळी करीना खूप ढोबळी (जाड या अर्थाने) होती. एका बाकड्यावर एकटी जेमतेम मावायची. बाजूच्याला जागाच मिळायची नाही, एवढी ढोबळी होती ती. पण तिचा तो चेहरा, ग्लो, तिचे घारे डोळे आणि एवढ्या मोठ्या गाडीतून ती उतरायची की सगळे जण ‘कोण आलं, कोण आलं’ म्हणत तिला बघायला थांबायचे.