Kartiki Gaikwad Brother Singer Kaustubh Gaikwad : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. रेश्मा शिंदे, अभिषेक गावकर, शाल्व किंजवडेकर, किरण गायकवाड, हेमल इंगळे या सगळ्या कलाकारांचे लग्नसोहळे थाटामाटात पार पडले. तर, येत्या काही दिवसांत शिवानी सोनार व अंबर गणपुळे हे विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता आणखी एका मराठी गायकाने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून कार्तिकी गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. ती पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. कार्तिकीला आपल्या घरातच गायनाचा वारसा लाभलेला आहे. तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाड सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. काही चित्रपटांसाठी त्याने पार्श्वगायन केलेलं आहे. याशिवाय कार्तिकी, तिचे वडील व भाऊ मिळून गाण्यांचे अनेक शोज देखील करतात. सध्या कौस्तुभ वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
‘सनम तेरी कसम’च्या सरूने केलं लग्न, पाकिस्तानी अभिनेत्री मावराने निकाहचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”

हेही वाचा : मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर

कौस्तुभ गायकवाडचं लग्न ठरलेलं आहे. होणाऱ्या पत्नीसह फोटो शेअर करत गायकाने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. या जोडप्याचा कुंकुम तिलक कार्यक्रम नुकताच पार पडला असून आता लवकरच कौस्तुभ विवाहबंधनात अडकणार आहे.

कौस्तुभ पोस्ट शेअर करत लिहितो, “Officially engaged! Yes to forever” गायकावर सध्या मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय कार्तिकी गायकवाडने सुद्धा कौस्तुभसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral

Kartiki Gaikwad Brother Singer Kaustubh Gaikwad
कार्तिकी गायकवाडच्या भावाचं लग्न ठरलं ( Kartiki Gaikwad Brother Singer Kaustubh Gaikwad )

हेही वाचा : Bigg Boss 18 : “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”

लाडक्या भावासाठी पोस्ट शेअर करत कार्तिकी लिहिते, “खूप खूप अभिनंदन कौस्तुभ दादा आणि काव्या” दरम्यान, गायकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज’ चित्रपटातलं ‘लग्नाळू’ हे गाणं गायलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं. आजही प्रत्येक समारंभात हे गाणं वाजवलं जातं. याशिवाय कौस्तुभने अनेक अभंग देखील गायले आहेत.

Story img Loader