Baipan Bhari Deva Film : ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाल्याने संपूर्ण टीमने नुकतेच सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सहायक दिग्दर्शिका म्हणून त्यांची लेक सना शिंदेने संपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. चित्रपटाच्या प्रत्येक अभिनेत्रीने प्रमोशनदरम्यान सनाचे विशेष कौतुक केले होते.
हेही वाचा : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीसाठी जुई गडकरीने घेतला पुढाकार, पोस्ट शेअर करत म्हणाली…
सना शिंदे ‘बाईपण भारी देवा’प्रदर्शित झाल्यावर काही वैयक्तिक कामानिमित्त अमेरिकेला गेली होती. आता चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सनाने संपूर्ण टीमसह छानसा सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. सनाने या फोटोला “द भारी सेल्फी” असे कॅप्शन देऊन पुढे हार्ट इमोजी जोडला आहे. तिने शेअर केलेल्या सेल्फीमध्ये ‘बाईपण भारी देवाची’ जवळपास संपूर्ण टीम दिसत आहे.
हेही वाचा : सिंधुताईंच्या भूमिकेला आवाज देणार ‘ही’ मराठी अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझं भाग्य…”
सनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा चौधरी, सुचित्रा बांदेकर, दिग्दर्शक केदार शिंदे, गायिका सावनी रविंद्र, डिझाइनर युगेशा ओमकार, ओमकार मंगेश, सनाची आई आणि केदार शिंदे यांची बायको बेला शिंदे दिसत आहेत.
हेही वाचा : “कौरवांनी द्रौपदीचे कपडे…”, मणिपूर घटनेवर कुशल बद्रिकेची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, “श्री कृष्णाची…”
दरम्यान, सनाने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. तसेच अभिनेत्री अमृता खानविलकरने या पोस्टवर ‘क्युटीज’ अशी कमेंट केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना दिसत आहे.