दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटात शाहीरांची पत्नी ही भूमिका साकारली आहे. यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट केली आहे.

केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. केदार शिंदेंची मुलगी सना शिंदेने महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. सना शिंदेच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच तिचे वडील केदार शिंदे यांनी तिच्याबद्दल एक पोस्ट लिहित तिला सल्ला दिला.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली “नसेल पाहिला तर…”

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
Kangana Ranaut
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले, “सर्व समुदायांच्या भावना…”
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

केदार शिंदेंची पोस्ट

“धडा पहिला! सना शिंदे तू पहिल्यांदा काम करणार याचं टेन्शन दिग्दर्शक म्हणून होतच पण, त्याहीपेक्षा कैक पटीने बाप अस्थिर होता”, असे केदार शिंदेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

केदार शिंदेंनी ही पोस्ट करताना तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत केदार शिंदे हे सनाला एक सीन समजवून सांगताना दिसत आहे. तर सना ही त्यांच्या सूचना ऐकताना दिसत आहे.

आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.