‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजे शाहीर साबळे यांचा आज स्मृतिदिन. २० मार्च २०१५ रोजी मुंबईतल्या राहत्या घरी वृद्धापकाळाने शाहीर साबळे यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षांचे होते. आज त्यांना जाऊन ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने नातू, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक भावुक खास पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदार शिंदे यांनी शाहीर साबळेंचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “बाबा…शाहीर साबळे…आज तुमचा स्मृतिदिन…तुम्ही अजूनही आहात. प्रत्येक माणसाच्या मनात आणि तुमच्या अलौकिक गाण्याने, प्रत्येकाच्या कानात. वर्षानुवर्षे तुम्ही स्मरणात रहाल, कित्येक पिढ्या तुमच्याबद्दल जाणून घेऊ शकतील म्हणून #महाराष्ट्रशाहीर सादर केला. तुम्ही जे कलात्मक संस्कार केलेत त्याची गुरूदक्षिणा…”

हेही वाचा – ओळख न देणं, अ‍ॅटिट्यूड अन्…, प्रिया बेर्डेंनी सध्याच्या कलाकारांच्या वागणुकीबाबत व्यक्त केली खंत, म्हणाल्या….

केदार शिंदे यांच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनी शाहीर साबळेंना विनम्र अभिवादन केलं आहे. वैशाली सामंत, सुकन्या मोने, जयवंत वाडकर, सीमा घोगळे, मयुर पवार, अशा अनेक कलाकारांनी केदार शिंदेंच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – सुबोध भावेने मोबाइलमध्ये बायको मंजिरीचा नंबर मजेशीर नावाने केलाय सेव्ह, कारण सांगत म्हणाला…

दरम्यान, शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा आहेत. केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. गेल्या वर्षी केदार यांनी शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटात शाहिरांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरीने साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar shinde share special post for grandfather shahir sable on him death anniversary pps
Show comments