केदार शिंदे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर फक्त महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण जगाने प्रेम केलं. आता त्यांच्या पश्चात हा वारसा त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत. ३ सप्टेंबर हा शाहीर साबळे यांचा जन्मदिवस असल्याने केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “१४८ तास शूटिंग, पुरुषांच्या बाथरूममध्ये अंघोळ अन्…”, अंकिता लोखंडेचा ‘पवित्र रिश्ता’बद्दल मोठा खुलासा

केदार शिंदे यांची पोस्ट

बाबा.. शाहीर साबळे.. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९ मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पूर्ण झालं. तुमच्या आयुष्याचं documentation झालं. अ‍ॅमेझॉन प्राइमला आज “महाराष्ट्र शाहीर” सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, संजय आणि अंकुश चौधरी यांच्या मदतीने हे शक्य झालं. शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून रहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे?? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातू म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे.. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल.. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खुप झालं!!!

हेही वाचा : “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”

शाहीर साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहिरांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जीवनकार्याचा वेध ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून घेण्यात आला. ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या महाराष्ट्र गीतासह ‘या गो दांड्यावरून…’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या…’ अशी दर्जेदार लोकगीतं त्यांनी महाराष्ट्राला दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. दरम्यान, केदार शिंदे यांनी या पोस्टसह शाहीर साबळे यांच्याबरोबरचा जुना फोटो शेअर करत त्यांना अभिवादन केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar shinde shared post for shahir sable on the occasion of his birth anniversary sva 00