दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने ५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे अनेक किस्से सध्या केदार शिंदे शेअर करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’चे आगळेवेगळे कथानक कसे सुचले, कोण आहे चित्रपटाची लेखिका? जाणून घ्या…

बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी केदार शिंदे यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आलेले अनुभव सांगितेले आहेत. शिंदे म्हणाले, “आता मला इन्स्टाग्रामवर मेसेजमध्ये बायका मला त्यांचे प्रॉब्लेम येऊन सांगतात. त्यांची इच्छा असते की, मी याच्यावर काहीतरी उत्तर द्यावं. आता मी त्यांचा कौंसिलर झालोय. मला असं वाटतं मी त्यांच्यासाठी एवढा हक्काचा माणूस झालो असेल तर त्याचं सगळं श्रेय हे बाईपण भारी देवाच्या टीमला जातं.”

हेही वाचा- “आमचा साडेतीन वर्षांचा संसार…” दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्या नेहा पेंडसेचे वक्तव्य, म्हणाली “लग्नानंतर स्त्रियांनाच…”

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. त्याबरोबर अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar shinde talk about his experience after baipan bhari deva film dpj