‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६५ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटातील मुख्य ६ अभिनेत्रींनी त्यांच्या सहज, सुंदर अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग अभिनेत्रींबरोबरच दिग्दर्शक केदार शिंदे यांचेही प्रचंड कौतुक करत आहे.
हेही वाचा- ‘गंगुबाई’ फेम निर्मिती सावंतच्या लेकासाठी २६ जुलै तारीख आहे खास, कारण…
२९ एप्रिल २०१६ साली ‘सैराट’ सर्वत्र प्रदर्शित झाला होता. ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला आता सात वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही चित्रपटाने कमाईच्या बाबतीत या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलेला नाही. ‘बाईपण भारी देवा’ ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपट कमाईच्या बाबतीत सैराटचा रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावर ‘बाईपण भारी देवा’चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा- “तिनं ५०० रुपये माझ्या अंगावर फेकले अन्…”; अभिनेता संतोष जुवेकरने सांगितला ब्रेकअपचा ‘तो’ किस्सा
केदार शिंदे म्हणाले, “बाईपण भारी देवा’ सैराटचा रेकॉर्ड मोडणार का याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. ही प्रेक्षकांच्या ताब्यात असलेला चित्रपट आहे. त्यांनी ठरवायंच आहे वेड लावून सैराट आणायच का”
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवली आहे. यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. स्त्रियांवर आधारीत या चित्रपटाला पुरुष वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.