केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर केदार शिंदेंची पत्नी बेला शिंदेंनी हटके प्रतिक्रिया दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

बाईपण भारी देवा हा चित्रपट हिट झाल्यानंतर केदार शिंदेंनी ‘एबीपी माझा’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना कुटुंबाच्या प्रतिक्रियेबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी केदार शिंदेंनी पत्नीच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले.

आणखी वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला शरद पोंक्षेंचा रामराम, कारण आले समोर, म्हणाले “माझ्या जागी…”

“माझी पत्नी ही या चित्रपटाची सहनिर्माती होती. ज्यावेळी चित्रपटाला निर्माते मिळत नव्हते, तेव्हा तिने मला सांभाळून घेतलं. ती या चित्रपटात एक महत्त्वाचा भाग म्हणून खंबीरपणे पाठीशी उभी होती. काही दिवसांपूर्वी शांतपणे ती मला म्हणाली, सर्व ठिक आहे. मला इतकंच कळलं की बायकांचं मन कळतं, बायकोचं मन कळत नाही. ही माझ्यासाठी खूप मोठी प्रतिक्रिया होती”, असे केदार शिंदेंनी म्हटले.

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात तब्बल २४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात तब्बल ५७.१५ कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटाने २४ दिवसात ६५.६१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar shinde wife bela shinde reaction after watch baipan bhari deva movie reveled during interview nrp