‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत पत्नी बेला शिंदेला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या फोटोबरोबर त्यांनी सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. केदार शिंदे यांच्या पोस्टवर त्यांना चाहते व मित्र-मैत्रिणींकडून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत.

“तुमच्या पोटात का दुखतंय?” ‘केरला स्टोरी’वरून टीका करणाऱ्या केदार शिंदेंवर भाजपा नेत्याची आगपाखड, म्हणाले, “तुमची देशभक्ती…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!

“प्रिय बेला, गेली २७ वर्षे, माझ्या प्रत्येक वेडेपणात माझ्या पाठीशी उभी आहेस. हे मागचं दिड वर्ष तर मी झपाटल्यासारखा ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये गुंतलो, पण माझ्या कामात ढवळाढवळ न करता, तू मात्र प्रत्येक आव्हानांना तोंड दिलंस. आत्ता सगळीकडून उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही शांत संयमी राहाण्याचा नेहमीप्रमाणे सल्ला दिलास. अजून खुप काही करायचं आहे. तुला सुखात ठेवायचं आहे. त्यामुळे आणखीन वेडेपणासाठी तयार राहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असं कॅप्शन लिहित केदार शिंदेंनी पत्नीला बेलाला शुभेच्छा दिल्या आहेत.

केदार शिंदेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केदार शिंदे व बेला शिंदे यांच्या लग्नाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना सना नावाची मुलगी असून ती ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये झळकली होती.

Story img Loader