गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार मंडळी स्वतःच्या हक्काचं घर घेताना दिसत आहेत. ऋतुजा बागवे, सई ताम्हणकर, मीरा जोशी, सई लोकूर, साधना सागर, स्मिता शेवाळे, प्रसाद खांडेकर, विकास पाटील, धनश्री काडगावकर अशा बऱ्याच कलाकारांनी नवं घर घेतलं आहे. आता यामध्ये लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरची देखील भर पडली आहे.

केतकी माटेगावकरने देखील स्वप्न नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. तिने मुंबईतील एका इमारतीत १८व्या मजल्यावर नवं घर घेतलं आहे. पण या घराचं डाउन पेमेंट आणि ईएमआय भरण्यासाठी कशाप्रकारे पैशाची बचत केली याविषयीचा केतकीने अनुभव सांगितला आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
friend beaten , loan , Pune, Bhosari, pune news,
पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”

हेही वाचा – “तुझं लग्न कधी आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी म्हणाली, “पत्रिका…”

‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना केतकीने नव्या घराचं डाउन पेमेंट आणि ईएमआय विषयी सांगितलं. ती म्हणाली, “अक्षरशः चांदण्या चमकायला लागतात. डाउन पेमेंटचे पैसे जमवता, जमवता पुरेवाट होते. पण मी अशा विचारांची आहे की, झालं ना. आता तुम्ही इतके दिवस शॉपिंगची मज्जा केली किंवा काय आवडलं तर लगेच ऑनलाइन ऑर्डर करायचं या सगळ्याची मज्जा केली ना, असं मी स्वतःलाच समजवते. जर मोठ्या गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला संयमाची गरज असते. म्हणून मी अक्षरशः सगळ्या गोष्टींवर पडदा टाकला. सगळे खर्च कमी केले. एक अशी वेळ होती की, तेव्हा मी माझ्या आईकडून दागिने घ्यायचे. माझ्या मैत्रिणीचे-बहिणीचे कपडे घातले आहेत. पण मी ठरवलं नाही म्हणजे नाही. मी शॉपिंग पण केली नाही. खूप ठरवून मी पैशांची बचत केली आणि भरपूर काम करतेय.”

हेही वाचा – ‘बॉईज ४’ चित्रपटात ओंकार भोजने का नाही?; दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी केला खुलासा, म्हणाले…

“आताही जेव्हा देवाच्या कृपेने फ्लॅट बूक केला त्या दिवसापासून काम सुद्धा प्रचंड वाढलं. ज्या दिवशी मी फ्लॅट बूक केला होता त्याच्या दुसऱ्याच आठवड्यात मला ‘मीरा’ चित्रपटाची ऑफर आली. हा प्रसाद ओकबरोबर येणारा माझा चित्रपट आहे. हे सगळं जुळून येतं. जेव्हा तुम्ही मोठी उडी घेता तेव्हा ती गोष्ट पूर्ण व्हायला बाकीच्या गोष्टी सुद्धा मदत करतात. हे मी अनुभवलं आहे. डाउन पेमेंट करताना होईल का? होईल का? असं खूप वाटतं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत ती रक्कम जमेपर्यंत पुरेवाट होते. पण ती रक्कम जमली. डाउन पेमेंट झाल्यानंतर जशी घराची चावी हातात आली, तशी मी खूप भावुक झाले,” असा अनुभव केतकीनं सांगितला.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेचा रेकॉर्डब्रेक टीआरपी; जुई गडकरीसह कलाकारांचा एकच जल्लोष, अभिनेत्री म्हणाली, “छप्पर फाडके…”

दरम्यान, केतकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचा नुकताच ‘अंकुश’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने रावीची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात केतकी व्यतिरिक्त दीपराज, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी जबरदस्त कलाकार मंडळी आहेत.

Story img Loader