अभिनेता रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चित्रपटातील गाणी तर एवढी लोकप्रिय झाली आहेत की अगदी परदेशी रील स्टार्सना या गाण्यांची भुरळ पडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह प्रसिद्ध रील स्टार किली पॉललाही ‘वेड’च्या ‘वेड लावलंय’ या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावरील डान्सचा किली व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे.

किली पॉल दक्षिण आफ्रिकेच्या तंजानियामधील एक प्रसिद्ध रील स्टार आहे. तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून त्याचे इन्स्टाग्रामवर ४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. किली पॉल भारतीय गाण्यावर रील बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत. त्यानंतर त्याला रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ची भुरळ पडली आहे.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

आणखी वाचा- Video: ‘सैराट’ चित्रपटाचा विक्रम मोडणाऱ्या ‘वेड’ची आर्चीला भुरळ, रिंकू राजगुरूचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

किली पॉलने ‘वेड लावलंय’ या गाण्यावर धम्माल डान्स केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं, “हे मराठी गाणं म्हणजे आयुष्य. वेड लावलंय. कोणी मराठी चाहते आहेत का इथे?” याचबरोरबर किलीने या पोस्टमध्ये सलमान खान, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख यांनाही टॅग केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर स्वतः रितेश देशमुखनेही कमेंट केली आहे. “तुम्ही खरंच कमाल आहात. खूप सारं प्रेम” असं त्याने कमेंट करताना लिहिलं आहे.

आणखी वाचा- Golden Globe Award 2023 मध्ये भारताचा डंका! ‘RRR’चं ‘नाटू नाटू’ ठरलं सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं

दरम्यान या चित्रपटाच्या टीझर ट्रेलरसह, सगळ्या गाण्यांना प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार असा विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

Story img Loader