Dharmaveer 2 Trailer Launch: आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट दोन वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता निर्माते या सिनेमाचा दुसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल किरण माने यांनी सलमान खानचा (Salman Khan) उल्लेख करत एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

‘धर्मवीर २’ चा ट्रेलर लाँच सोहळा २० जुलै रोजी पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सलमान खान, अशोक सराफ, अभिनेते जीतेंद्र, बोमन इराणी व गोविंदा यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचा उल्लेख करत किरण माने यांनी टोला लगावला आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”

१३ वर्षांच्या संसारानंतर मोडला सेलिब्रिटी जोडप्याचा प्रेमविवाह, अभिनेत्री एकटीच करतेय मुलीचा सांभाळ; म्हणाली, “माझं लग्न मोडल्यावर…”

“छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांचा आदर करणारं हिंदुत्व शिकवलंय आपल्याला. हिंदुत्व म्हणजे मुस्लीमद्वेष नव्हे.” हे पटत नव्हतं ना? हा घ्या ढळढळीत पुरावा… ‘हिंदुत्वाची गोष्ट’ सांगणार्‍या सिनेमाच्या प्रमोशनला सुद्धा वन ॲन्ड ओन्ली, ‘द सलमान खान’ हा अस्सल पठाण लागला! भारी वाटलं. धर्म ठेकेदारांना सलमानभाईच्या मागेपुढे करताना बघून लै लै लै भारी वाटलं,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

 kiran mane dharmaveer 2 salman khan
किरण माने यांनी केलेली फेसबूक पोस्ट

सोनाक्षी सिन्हाची पती झहीरसह फिलिपिन्स सफर, हनिमूनचे रोमँटिक Photos केले शेअर

सलमान खानचे मुख्यमंत्री शिंदेंनी केले होते स्वागत

या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला आलेल्या सलमान खानने मंचावर उपस्थित सर्वांची गळाभेट घेतली होती. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही गळाभेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सलमान खानचे (Salman Khan at Dharmaveer 2 Trailer Launch) पैठणी शेला व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. त्याच्या स्वागताचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

दरम्यान, ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रसाद ओक यात आनंद दिघे यांच्या भूमिकेत तर, क्षितिज दाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून निर्माते मंगेश देसाई आहेत. क्रांती दिनाच्या औचित्यावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दोन्ही भाषेतील ट्रेलर २० जुलैला पार पडलेल्या कार्यक्रमात लाँच करण्यात आले.

Story img Loader