लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निकालांआधी भाजपाने ४०० पार जाण्याचा दावा केला होता. पण एनडीएला २९२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे, दुसरीकडे इंडिया आघाडीने २३० हून अधिक जागा मिळवल्या. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला सर्वाधिक ३० जागा जिंकण्यात यश आलं, तर महायुतीला १७ जागांवर विजय मिळाला आणि एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. निवडणूक निकालांबद्दल अभिनेते व ठाकरे गटाचे नेते किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत आहे.
एन.डी.ए. ही विचार, मैत्री वगैरे जुळणार्या पक्षांची नैसर्गिक ‘युती’ वगैरे नाही. सत्ताधार्या क्रूर दरोडेखोरांनी ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स वगैरे यंत्रणांचा असंवैधानिक गैरवापर करून… धाक दाखवून… भिती दाखवून… बळजबरीने कॉलर पकडून खेचून आणलेल्या अनेक हतबल पक्षांची जमवलेली ‘टोळी’ आहे. हे स्वाभिमानावर गदा येऊन सो कॉल्ड ‘महाशक्ती’कडे गेलेले लोक, आता या जुल्मी माजोरड्यांच्या दहशतीचा वचपा काढायची अनमोल संधी सोडणार नाहीत, हे सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही.
…डोक्याला पिस्तूल लावून धाक दाखवत पक्ष फोडून आणलेल्या खासदारांचे जुळवलेले ‘आकडे’ दाखवत, ‘एनडीए सत्तेत आली’ असं क्षीण स्वरात सांगताना काल हुकूमशहांच्या चेहर्यावरची हतबलता लपत नव्हती. कारण जनतेनं यावेळी त्यांना बरोब्बर ‘सिग्नल’ दिलेला आहे की ‘तुम्ही आम्हाला नको आहात.’
हा निकाल संपूर्ण देशाला अपार आनंद देऊन गेला.
आनंद याचा आहे की “हा देश आमच्या बापाचा आहे.” हा रंगाबिल्लाचा माज ठेचला गेला.
How is the Josh? स्मृती इराणींची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया
आनंद याचा आहे की, “चारसो पार. आयेगा तो झिंगूर ही. चार जूनला बघतो तुला.” ही भक्तडुक्कर पिलावळीची चिखलफेक त्यांचंच तोंड काळं करून गेली.
आनंद याचा आहे की ऑरगॅजमिक स्वरात किंचाळून आपल्या मालकाची सत्ता येणारच या माजात, ढोलताशे बडवत निकाल सांगणार्या पाळीव मिडीयाची थोबाडं ठेचली गेली.
आनंद याचा आहे की माझ्या भारत देशानं हुकूमशहांच्या सणसणीत मुस्काडात देऊन सांगितलं की आम्हाला धर्मद्वेष नको. आम्हाला मंदिराचं पावित्र्य भंग करणारं राजकारण नको. आम्हाला संविधानाशी छेडछाड नको. आम्हाला बलात्कारी भ्रष्टाचारी लोकांनी खचाखच भरलेली व्यवस्था नको. आम्हाला ‘तुम्ही’ नको.
खरंतर याहून दणदणीत निकाल लावून जनतेनं यांना लाथ घातलीय… पण काहीतरी फ्रॉड झालाय म्हणून हे आकडे कमी दिसतायत, हे नक्की. इव्हीएम घोटाळा तर नक्कीच झालाय. त्याची सखोल चौकशी आता होईलच. असो.
आता देश आमचाच. आता आम्हीच इथले अनभिषिक्त सम्राट असं समजून गेली दहा वर्ष सर्वसामान्य जनतेला, शेतकर्यांना, महिलांना, पाठीचा कणा ताठ ठेवणार्या दोनतीन कलाकारांना अर्वाच्य शब्दांत ट्रोल करणार्या पिलावळीला एकच सांगतो… अब शुरू होगा असली ‘खेला’. सब याद रख्खा जायेगा… सबकुछ याद रख्खा जायेगा. जय शिवराय… जय भीम,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.