किरण माने यांनी दिवंगत बॉलीवूड अभिनेता इरफान खानसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. इरफान यांचा अभिनय, त्यांचे बोलके डोळे आणि त्यांनी बॉलीवूड ते हॉलीवूमध्ये केलेल्या भुमिका यांचा उल्लेख किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“भावा, तुझे डोळे…
एखाद्या गहिर्या डोहासारखे होते रं !
आजबी रूतून बसलेत काळजात.
आयुष्यभर रहातील तिथंच वस्तीला… तू लहान असताना तुझे वडील तुला पाहुन म्हनायचे “ये ऑंखे नहीं. ‘जाम’ है भरे हुए” उफ्फ्फ !
एक ‘अभिनय’ सोडला तर मला दुनियादारी म्हाईत नाय. त्यामुळं बाकीच्या फकांड्या मारत नाय. अभिनेता म्हनून एकच कळतं… एखादं उत्तम लिहीलेलं ‘कॅरॅक्टर’ नखशिखान्त मुरवून घेनं… भिनवून घेनं… ‘आतल्या’ – मनामेंदूतल्या महासागरात चालनार्या भरती-ओहोटींसकट देहबोलपर्यन्त साकारनं… हे लै लै लै मोठ्ठं – अवाढव्य काम असतं. खायचं काम नाय हे.
पन तू? हे एवढा मोठ्ठ्ठा अभिनयाचा भव्य हिमनग निव्वळ नुसत्या डोळ्यांवर पेलून धरायचास राव ! नादखुळा.. भिरकीट… नुस्त्या नजरंतनं जाळ न् धूर संगटच काढायचास !
बॉलीवूड-हॉलीवूड सकट सगळी दुनिया पागल केलीस बहाद्दूरा… सगळ्या जगावर गारूड केलं तुझ्या त्या दोन जादूभर्या – दर्दभर्या डोळ्यांनी ! ‘मकबुल’ असो नायतर ‘मदारी’… ‘पान सिंग तोमर’ असो नायतर ‘पिकू’… लंचबॉक्स, नेमसेक, लाईफ ऑफ पाय, लाईफ इन मेट्रो, हासिल… तुला मिळालेल्या भुमिकेची अख्ख्खी जिंदगी ‘निचोड’कर तू त्या डोळ्यांत भरायचास आनी आमच्यासमोर आनून ओतायचास…
तू अभिनयाबाबतीत सगळ्या जुन्यापान्या जळमटांवरनं झाडू फिरवलास. सगळ्या चौकटींवरनं बुलडोझर फिरवुन चक्काचूर केलास. सगळ्या चाकोर्यांवरनं जेसीबी फिरवलास.
गांवखेड्यातनं आलेल्या – ‘स्मॉलटाऊन’ – साधारन चेहर्याच्या पन अभिनयाची अफाट – अचाट ‘पॅशन’ असलेल्या पुढच्या पिढ्यांसाठी तू आता एव्हरेस्टसारखा उभा आहेस… तुझे ते जादूई दोन डोळे या जगात नाहीत पण कुठूनतरी अशा अभिनेत्यांवर नजर ठेवून आहेत… एखाद्या सावलीसारखे…
इरफान, काल ‘मकबुल’ परत एकदा बघितला… परत एकदा काळजात कालवाकालव झाली… परत एकदा मेंदूतून झिणझिण्या आल्या… तस्साच नखशिखान्त हादरलो… आणि परत एकदा डोळे पाणावले… तुझी लै लै लै आठवण आली. मिस यू. लब्यू भावा – किरण माने,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या अभिनयाने आणि बोलक्या डोळ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे इरफान खान यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. पण त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा ‘मकबुल’ चित्रपट पुन्हा पाहिल्यानंतर किरण मानेंनी ही पोस्ट लिहीली.