अभिनेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चालू घडामोडींविषयी परखड मत मांडत असतात. याशिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना माहिती देत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट या वाचनीय असतात. पण अनेकदा ते ट्रोल होतात आणि या ट्रोलर्सना ते सडेतोड उत्तर देतात. नुकतीच किरण माने यांनी भरत जाधव यांच्यासंदर्भात एक पोस्ट करत त्यांचं कौतुक केलं आहे.
मराठी सिने व नाट्यसृष्टीत भरत जाधव यांचं नाव अत्यंत अदबीनं घेतलं जातं. स्वतःचं आयुष्य नाट्यकलेला वाहिलेल्या कलाकारांपैकी एक भरत जाधव आहेत. सध्या त्यांचं रंगभूमीवर ‘अस्तित्व’ हे नाटक सुरू आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणार हे कौटुंबिक नाटक रसिक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. नुकतंच किरण माने यांनी ‘अस्तित्व’ नाटक पाहिलं. याच नाटकाच्या निमित्ताने किरण यांनी भरत जाधव यांचं कौतुक केलं.
हेही वाचा – Video: पूजा सावंतच्या साखरपुड्यात मित्र-मैत्रीणींची धमाल-मस्ती, प्रार्थना बेहेरेने शेअर केला व्हिडीओ
किरण माने काय म्हणाले?
भरत जाधवचं अभिनेता म्हणून कौतुक करण्याआधी ‘निर्माता’ म्हणून त्याची पाठ थोपटावी वाटली. ‘धंदा’ या गोष्टीचा विचार न करता त्यानं एक आशयघन, गंभीर आणि अस्सल मराठी नाटक रंगभूमीवर आणलं ‘अस्तित्व’. व्यावसायिक नाटक म्हटलं की एक चकचकीत शहरी उच्चवर्गीय जोडपं आणि त्यांच्यातले पुचाट भाबडे समज-गैरसमज, गोड गुळमट गाणी, अधूनमधुन ‘पेरलेले’ टाळीबाज सुविचार आणि शेवटी सगळे गैरसमज दूर होऊन पडदा पाडणं…नाटक संपल्यावर डायबेटिस होतोय का काय अशी भिती वाटते. हल्ली नाटकांची उथळ नावं आणि चकचकीत रंगीबेरंगी पोस्टर्स बघूनच शिसारीच येते.
अशा भयाण परिस्थितीत एक असं नाटक आणणं, ज्यात नाटकभर चाळीतली रंग उडालेली खोली दिसते…नाटकाचा हिरो बीएमसी मधला सफाई कामगार आहे, ज्याच्या आयुष्यातले रंगही असेच उडून गेलेत…नाटकभर त्याची आणि त्याच्या कुटुंबाची वेदना आणि दु:ख…हे सगळं एका कोपर्यात बसून पाहणारे तथागत बुद्ध आणि डॉ.आंबेडकर. सगळंच ‘व्यावसायिकते’च्या सगळ्या गणितांना छेद देणारं.‘अस्तित्व’चा अफलातून, जबराट लेखक, दिग्दर्शक स्वप्निल जाधव आणि सगळे कलाकार याविषयी सविस्तर लिहीन नंतर…पण आधी असा विषय रंगभूमीवर आणायचं धाडस दाखवल्याबद्दल निर्माता म्हणून भरतचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. पैसा कमावण्यासाठी सुमार नाटकं आणि त्यांचे ढीगभर प्रयोग ‘छापणार्यांची’ संधी असण्याच्या काळात निर्माता भरतनं वेगळा मार्ग निवडणं, हे खूप प्रेरणा देणारं आहे. जयंत पवार, विजय तेंडूलकर अशा नाटककारांच्या जवळपास जाणारी संहिता आजच्या भाकडकाळात येणं आश्वासकही आहे. लै दिवसांनी व्यावसायिक नाटक बघून मन आणि मेंदू तृप्त झाले…लब्यू भरत
– किरण माने
हेही वाचा – KGF स्टार यशच्या साधेपणाने जिंकली मनं; बायकोसाठी केली ‘ही’ गोष्ट, फोटो झाला व्हायरल
दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकले होते. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली होती; जी प्रेक्षकांना खूप आवडली. आता येत्या काळात अनेक चित्रपटांमध्ये किरण माने पाहायला मिळणार आहेत.