Kiran Mane post on Aurangzeb Tomb Controversy : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाची चर्चा होत आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांना दिलेल्या यातना ‘छावा’मध्ये दाखवण्यात आला आहे. अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता, त्याने मंदिरं बांधली होती, असं वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ झाला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं आहे. नागपुरात दंगल झाल्यामुळे तणावाचं वातावरण आहे. महाल परिसरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर दोन गटात मोठा वाद झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असताना किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खोटा ठपका ठेवणाऱ्यांची स्मारकं व पुतळे महाराष्ट्रातून उखडून टाका, अशी मागणी किरण माने यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर या लोकांची नावं ज्या सभागृहांना देण्यात आली आहेत, ती नावं बदलून छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं असंही ते म्हणाले आहेत.
किरण माने यांची पोस्ट
“छत्रपती संभाजी महाराजांना ‘बाई-बाटली’चा खोटा ठपका ठेऊन ज्यांनी बदनाम केलेले आहे त्या औरंग्याच्या औलादींची स्मारकं आणि पुतळे महाराष्ट्रातून उखडून टाका. त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहं, सभागृहांची नावं बदलून त्यांना संभाजीराजांचं नाव द्या.
जय शिवराय… जय शंभूराजे,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

किरण माने यांच्या पोस्टवरील कमेंट्स
किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. ‘उलट औरंग्याची कबर उकडून टाकण्याच्या अगोदर ह्या हरामखोरांची स्मारक नष्ट करून टाकायला हवी ,नाट्यगृह, उद्यानांची नाव बदलून टाकली पाहिजेत,’ ‘ह्याला ‘ते’ तयार होणार नाहीत’, ‘अगदी बरोबर सर मी तुमच्या मताशी सहमत आहे’, ‘हे बाकी खासच…ते यांनी करून दाखवावे. म्हणजे याचं छत्रपती शिवाजी महाराज विषयीचे प्रेम कळेल,’ अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.


‘एकदम बरोबर आहे तुमचे सर हे देखील तितकेच गुन्हेगार आहेत जितके तो औरंगजेब होता. यांच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. औरंगजेब तर परका होता. तो पाहिलेपासून राजांचा तिरस्कार करत होता, पण हे तर आपले असून देखील गोड बोलून राज्यांना फसवले आणि त्यांची बदनामी केली. पदोपदी त्यांचा तिरस्कार केला, बदनामी केली. त्यामुळे यांची देखील स्मारके उद्याने नाट्यगृह काढून टाकली पाहिजे,’ अशा कमेंट्स या किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.