मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, चित्रपटांना शोज मिळत नाहीत हे मुद्दे अनेकदा उपस्थित केले जातात. आता सध्या ‘TDM’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ हे दोन मराठी चित्रपट खूप चर्चेत आले आहेत. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘TDM’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. पण, बऱ्याच ठिकाणी टीडीएम चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राइम टाइम मिळत नसल्याची खंत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमने व्यक्त केली. याबाबत बोलताना या चित्रपटातील अभिनेत्याला अश्रूही अनावर झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आता या मुद्द्यावर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत अनेक मालिका, नाटके, चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख दिली. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या शोनंतर किरण माने सातत्याने चर्चेत आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्ग खूप वाढला. सोशल मीडियावरून ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते नेहमीच समाजातील त्यांना पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या गोष्टींबद्दल भाष्य करताना दिसतात. आता चित्रपटांना शो मिळत नाहीत, चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत याबाबत त्यांनी केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : “सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसा देते पण नाटक…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करीत लिहिले, “अस्सल मराठी मातीतल्या ‘TDM’ला शोज मिळत नाहीत. मराठी मातीचा दरवळ देशभर पसरवणाऱ्या शाहीरांना सलाम करण्यासाठी आलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ला शोज आहेत पण प्रेक्षक नाहीत. या वेळी खऱ्या अर्थाने मराठी ‘दीन’ झाली आहे.”

हेही वाचा : Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाणं सुरु होताच प्रेक्षकांनी केले असे काही की…; व्हिडीओ व्हायरल

आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट्स करीत नेटकरी त्यांना सहमती दर्शवीत असून मराठी चित्रपटांच्या या अवस्थेबद्दल त्यांची मते मांडत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane shared a post about maharashtra shahir and tdm film bad condition in theatres rnv
Show comments