भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा मराठी सिनेमा २८ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु, चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्याने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय दिग्दर्शकाने घेतला. त्यानंतर शुक्रवारी(९ जून) हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण मानेंनी ‘टीडीएम’ चित्रपटाचे पोस्टर व दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टही लिहिली आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा नवा मराठी सिनेमा, पोस्टर शेअर करत म्हणाली…

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

“भाऊराव कर्‍हाडे, कितीबी झालं तरी तू शेतकर्‍याचा पोरगा हायेस. संकट आस्मानी असूदे नायतर सुलतानी, तू मागं नाय हटनार ! कर्ज काढून मोठ्या आशेनं स्वप्नांची पेरनी केलीवतीस. पन अचानक अवकाळीनं घात केला. बियानं कुजून गेलं. तुला लै वेदना झाल्या… पुन्हा स्वत:ला सावरून तू एक पाऊल मागं घेतलंस.
दुबार पेरनी करायची हिंमत दाखवलीस, इथंच आमची मनं जिंकलीस. त्यानंतर तुझा मला फोन आलावता तवाबी तुला सांगीतलंवतं, आजबी सांगतो… आता कुनाचा बाप तुझी घोडदौड रोखू शकनार नाय. लढ तू. भुई कितीबी कठीन असली तरी ती भेदून तुझ्या सृजनाचं पिक तरारून वर येनार… खळं धान्यानं भरभरून वहानार…
ग्रामीण मातीशी नाळ असलेला प्रत्येक प्रेक्षक ‘टीडीएम’ बघनार… तुझा पिच्चर सुप्परडुप्पर हिट्ट होनार !आज दुबार रिलीज होणार्‍या ‘टीडीएम’ साठी लै लै लै मनभरून शुभेच्छा, भाऊराव !

किरण मानेंच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> रणबीर कपूर ‘आदिपुरुष’ सिनेमाची १० हजार तिकिटे खरेदी करणार, कारण…

‘टीडीएम’ चित्रपटातील कलाकारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले होते. अनेक कलाकार व राजकीय नेत्यांनीही याबाबत ट्वीट केलं होतं. ‘टीडीएम’ चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane shared special post for tdm marathi movie director bhaurao karhade kak