मराठी मनोरंजनसृष्टीतील नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेते म्हणजे किरण माने. त्यांना ‘बिग बॉस मराठी-४’ने वेगळी ओळख दिली. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. किरण मानेही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते नेहमीच त्यांना आवडलेल्या किंवा खटकणाऱ्या गोष्टींबद्दल सोशल मीडियावरून व्यक्त होत असतात. आता त्यांनी केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

‘तेंडल्या’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. किरण माने यांनी हा चित्रपट पाहिला आणि ते या चित्रपटाच्या अक्षरशः प्रेमात पडले. त्यांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटाची कथा, चित्रपटाचे दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. आता या चित्रपटातील एका कलाकारासाठी त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. हा अभिनेता म्हणजे फिरोज शेख.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

आणखी वाचा : “‘बकरा’ गळाला लागलाय म्हणून…,” किरण मानेंनी केले आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांना लक्ष्य; पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी फिरोजबरोबरचा एक फोटो शेअर करीत लिहिले, “…’तेंडल्या’ बघून आल्यानंतरबी मनात घर करून राहतो, तो त्यातला गजा… गजानन ! पैज लावून सांगतो, सिनेमा बघताना माझ्या पिढीतला प्रत्येक जण ‘गजा’ झाल्याशिवाय राहणार नाय. लहानपणी आपण बघितलेली छोटी छोटी, पण त्या काळात डोंगराएवढी वाटणारी स्वप्नं… ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस घेतलेला ध्यास… लागलेलं वेड… त्यासाठी झालेला त्रास… वेदना… आणि स्वप्नपूर्तीनंतरचा आनंद. हे सगळं-सगळं आठवतं !”

पुढे ते म्हणाले, “फिरोज शेख हा अभिनेता गजा अक्षरश: जगलाय… छोट्या-छोट्या बारकाव्यांनिशी आपल्यासमोर जिवंत केलाय… अलीकडच्या काळात मराठीत एवढे पिच्चर येताहेत, पण अभिनयाच्या बाबतीत मन मोहून टाकेल, असा अभिनय नाही बघायला मिळाला… उलट चांगल्या भूमिकांची माती झालेली बघताना घुसमट व्हायची… त्या त्रासातनं इस्लामपूरच्या या पठ्ठ्यानं सुटका केली. लै लै लै समाधान वाटलं. किती तरी दिवसांनी पडद्यावर एक अस्सलपणे, मनापासून, अभ्यासून साकारलेली भूमिका पाहायला मिळाली. जीव थंडगार झाला.”

हेही वाचा : “‘TDM’ला शोज मिळत नाहीत आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ला…,” किरण मानेंनी व्यक्त केली खंत; पोस्ट चर्चेत

शेवटी त्यांनी लिहिलं, “फिरोज, भावा… पिच्चर संपल्यावर तुला शोधत आलो. तुला घट्ट मिठी मारली. तुझं मनभरून कौतुक केलं. तू बी नंतर मला बोलतं करून तुझ्या मोबाईलमधी माझ्या भावना टिपून ठेवल्यास. यापूर्वी तू माझा फॅन होतास, पण आता मी तुझा जबरा फॅन झालोय. अजूनबी तुझा ‘गजा’ पिच्छा सोडत नाय. अजून खूप कौतुक करायचं राहून गेलंय. लै मोठ्ठा हो भावा… तुझी सगळी स्वप्नं साकार होऊ देत.” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर कमेंट करीत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader