‘अधूरी एक कहाणी’ या मालिकेमुळे अभिनेत्री किशोरी गोडबोले घराघरांत लोकप्रिय झाल्या. ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अभिनेत्री सध्या कलाविश्वापासून लांब असल्या तरीही अलीकडे सोशल मीडियावर त्यांच्या लेकीची जोरदार चर्चा चालू आहे.
किशोरी गोडबोले यांच्या मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवत २०२१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांची मुलगी सई गोडबोले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनय आणि गाण्याबरोबरच ती उत्तम नृत्यदेखील करते. सईने मराठीतील अनेक जुनी गाणी नव्या रुपात गायली आहेत. तिने इन्स्टाग्रामवरील व्हायरल “प्रेमिका…” गाण्यावर नुकताच एक रील व्हिडीओ बनवला आहे.
हेही वाचा : Video : साडीप्रेम अन् प्राजक्ता माळीचे दागिने…; परदेशात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा मराठमोळा अंदाज
कानात झुमके, पिवळ्या रंगाची साडी अशा लूकमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. या दोघी मायलेकी सारख्याच दिसत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. “प्रेमिका ने प्यार से रील बना दिया” असं कॅप्शन सईने या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा : रणवीर सिंगच्या ‘डॉन ३’चं चित्रीकरण लांबणीवर पडणार; नेमकं कारण जाणून घ्या
दरम्यान, सईने शेअर केलेल्या प्रेमिका…गाण्याच्या व्हिडीओवर पूजा सावंत “सुंदर…” अशी कमेंट करत पुढे हार्ट इमोजी जोडले आहे. याशिवाय बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओला अवघ्या काही तासांतच साडेतीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.