मराठी चित्रपटसृष्टीतील ९०चं दशक आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. किशोरी यांच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे तितकाच त्यांच्या सौंदर्याचा देखील चाहता वर्ग आहे. किशोरी शहाणे यांनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्याबरोबर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दोघांचं ‘माझा पती करोडपती’ चित्रपटातलं ‘तुझी माझी जोडी जमली’ हे गाणं आजतागायत मराठी रसिक प्रेक्षकांच्या ओठी गुणगुणलं जातं. अशा या सुपरहिट जोडीची नुकतीच ग्रेट भेट झाली. याचे फोटो किशोरी शहाणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सध्या किशोरी शहाणे ‘झी टीव्ही’वरील ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत काम करत आहेत. याच मालिकेच्या सेटच्या शेजारी ‘कलर्स मराठी’वरील आगामी मालिका ‘अशोक मा.मा’चं चित्रीकरण होतं आहे. हे समजात किशोर शहाणे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना भेटण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत. किशोरी शहाणे, हेमांगी कवीने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लगेच जाऊन भेट घेतली.

Pushkar Jog
“मी माझ्या मुलीला फिल्म इंडस्टीमध्ये आणणार नाही”, पुष्कर जोगचं ठाम मत; ‘हा’ निर्णय घेण्यामागचं कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Snehal Tarde
“मी फार प्रेमात…”, लग्नात प्रवीण तरडेंकडे स्नेहल तरडेंनी मागितलेली ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”
Prasad Oak was on a liquid diet for 55 days for the film Dharmaveer
‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
neena kulkarni
“मी जिवंत आहे”, निधनाची अफवा पसरल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर

हेही वाचा – Bigg Boss 18 : हेमा शर्मानंतर रातोरात ‘या’ सदस्याला सलमान खानच्या शोमधून दाखवला बाहेरचा रस्ता, नेटकरी म्हणाले, “योग्य निर्णय”

किशोरी शहाणे फोटो शेअर करत म्हणाल्या, “ग्रेट भेट…खूप छान वाटलं. लाडके अशोक मामा आणि माझे आवडते सहकलाकार माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ या मालिकेच्या सेटच्या शेजारी चित्रीकरण करतायत हे मला समजलं. तेव्हा मी स्वतःला त्यांना भेटण्यापासून, त्यांच्याशी छान गप्पा मारण्यापासून आणि हसण्यापासून रोखू शकले नाही. दिग्गज अशोक सराफ आणि सुंदर अभिनेत्री निवेदिता सराफ हे ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील नवीन मालिका ‘अशोक मा.मा’चं चित्रीकरण करत होते…मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा मी एक भाग होते, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

हेही वाचा – हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ नाव कसं पडलं? याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या…

किशोर शहाणेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “किती मस्त माझे सगळे आवडते कलाकार एकाच फ्रेममध्ये आहेत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुमच्या सुपरहिट गाण्यात तुम्ही दोघांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला होता.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “सर्वोत्कृष्ट त्रिकुत्र.”

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा जाण्यासाठी जगभरातून चाहत्याचे येतायत फोन, पत्नी अनुभव सांगत म्हणाल्या, “काहीजण रडतात अन्…”

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अशोक सराफ यांच्या नव्या मालिकेचे आतापर्यंत दमदार प्रोमो आले आहेत. पण अद्याप मालिका कधीपासून सुरू होणार, हे जाहीर करण्यात आलेलं नाहीये. या मालिकेत अशोक सराफांसह अभिनेत्री नेहा शितोळे झळकणार आहे. तसंच या मालिकेत पाहायला मिळणाऱ्या आणखी बऱ्याच कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत.

Story img Loader