‘डॅम इट’ असं म्हणणारा हँडसम पोलीस अधिकारी साकारणारे अभिनेते, प्रयोगशील दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा आज वाढदिवस. मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, पुस्तकलेखन अशी मुशाफिरी करणाऱ्या या कलाकाराच्या आजवरच्या सफरीचा घेतलेला मागोवा.

‘ओ डॅम इट!’ हे तीन शब्द कानावर पडतात प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यासमोर एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजे महेश कोठारे यांचा. चित्रपटात कितीही बेधडक भूमिका साकारल्या तरीही खऱ्या आयुष्यात महेश कोठारे जसे आहेत तसा कलाकार ना आधी कधी झाला होता ना यापुढे कधी होऊ शकेल. अत्यंत उत्साही, आनंदी, कायम हसत खेळत राहणं, आव्हानांना सामोरं जाणं आणि येणाऱ्या आव्हानांवर मात करत यश मिळवणं असं त्यांचं व्यक्तिमत्व.

Controversy, Shukre commission,
शुक्रे आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही यावरून वाद, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतच मतभेद
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: लोकांना अवलंबून ठेवून मतपेढी मजबूत?
swabhimani shetkari sanghatana leader raju shetty become active after defeat in lok sabha elections
राजू शेट्टी यांची वाटचाल आव्हानात्मक
Emergency, ndira Gandhi,
विश्लेषण : इंदिरा गांधींनी राबवलेली आणीबाणी नेमकी काय होती? कारणे कोणती? परिणाम काय?
Seven girls from a normal family will now study in IIT
सामान्य घरातील ‘त्या’… आता शिकणार ‘आय.आय.टी.’त!
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
Eid al-Adha (Bakrid
बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी? वाचा नेमकं घडलं काय?
Uncle and Two guys on Road over they were doing stunts on Busy Road video
पुन्हा आयुष्यात स्टंटबाजी करणार नाही! भर रस्त्यात नागरिकांनी तरुणांना दिले फटके, VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “बरोबर केलं”

२८ सप्टेंबर १९५७ रोजी त्यांचा जन्म झाला. घरातूनच त्यांना कलेचा वारसा लागला. त्यांचे वडील अंबर कोठारे हे नाट्यअभिनेते होते. तर त्यांची आई जेमना यादेखील ऑल इंडिया रेडिओ आणि कला क्षेत्रात काम करत होत्या. ८०च्या दशकातील हँडसम अभिनेता अशी ओळख असलेल्या महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणूनच काम करायला सुरुवात केली होती. छोटा जवान या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. त्यानंतर ‘राजा और रंक’ या चित्रपटात त्यांनी केलेल्या कामाचंही खूप कौतुक झालं. पण अभिनयामध्येच सक्रिय न राहता त्यांनी पुढे वेगळी वाट निवडली.

महेश कोठारे यांनी एलएलबीचं शिक्षण घेतलं आणि अनेक वर्ष ते वकील म्हणून काम करत होते. कायद्याचं शिक्षण घेत असतानाही त्यांच्या कॉलेजमध्ये ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी हे नाटक बसवायला यायचे. त्यामुळे त्यांचाही सहवास महेश कोठारे यांना कॉलेजच्या दिवसांमध्ये लाभला. कॉलेजनंतर एकीकडे त्यांची वकिली सुरूच होती, तर दुसरीकडे कलाक्षेत्रात काम करण्यासाठी त्यांचा स्ट्रगलही सुरू होता. वकील म्हणून काम करत असतानाच त्यांना अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. घरचा भेदी, लेक चालली सासरला अशा चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आणि ती सुपरहिट ठरली. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारली आणि त्यालादेखील प्रेक्षकांकडून तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनयामध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीतही उतरायचा निर्णय घेतला.

‘अशी’ झाली ‘डॅम इट’ म्हणण्याची सुरुवात –
‘डॅम इट’ हा शब्द महेश कोठारे यांचा पेटंट शब्द आहे असं म्हणायला हरकत नाही. पोलीस ऑफीसरची भूमिका करताना त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये हा शब्द वापरला आहे. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता आणि याची सुरुवात कुठून झाली हे सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच ‘डॅम इट’ हा शब्द माझ्या तोंडात आहे. हा शब्द कुठल्याही चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये नव्हता. ‘धुमधडाका’मध्ये मी तो पहिल्यांदा म्हटला. त्यानंतर अण्णासाहेबांनी माझ्या त्या शब्दावर हरकत घेतली होती. पण मी त्यांना हो म्हटलं आणि संकलनातून तो शब्द काढला नाही. त्यामुळे ते चित्रपटात आलं. यानंतर ‘दे दणा दण’ आणि ‘थरथराट’मध्ये ते जास्त आलं. मी हा शब्द वापरल्यामुळे माझ्यावर वृत्तपत्रांमधून टीकाही झाली. पण नंतर हाच शब्द माझी ओळख झाली.

सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यात होतं शत्रुत्व?
सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांची मैत्री ही लहानपणीपासूनची. महेश कोठारे जेव्हा वकील म्हणून काम करत होते तेव्हा सचिन पिळगावकर सुपरस्टार झाले होते. महेश कोठारे अभिनेता म्हणून चित्रपटांमध्ये काम करू लागल्यानंतर सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यात काहीतरी शत्रुत्व आहे अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान सचिन पिळगावकर यांनी याबद्दल भाष्य करत खरं काय हे सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “कलाकार उत्तम काम तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला त्याच्या तोडीस तोड प्रतिस्पर्धी असेल. महेश आणि माझ्यात स्पर्धा छोटा पण ती फक्त पडद्यावर. पडद्यामागंच प्रेम कुणीही पाहिलं नाही. त्यामुळे जर प्रेक्षकांना आपल्या स्पर्धा आहे किंवा आपल्या शत्रुत्व आहे असं वाटत असेल तर वाटू दे असं म्हणून आम्ही त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं. त्याकाळी सगळेच चित्रपट सिल्व्हर ज्युबली व्हायचे नाहीत. पण आमचे व्हायचे. एकमेकांच्या चित्रपटाची सिल्व्हर ज्युबली झाली की असं एकदाही झालं नाही की त्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात मी महेशसाठी गेलो नाही किंवा महेश माझ्यासाठी आला नाही. आम्ही कायमच एकमेकांना कामांमध्ये पाठिंबा आणि प्रोत्साहन देत आलो आहोत. महेश आणि माझे चित्रपट वेगळे होते. आमच्या जितकी स्पर्धा होती तितकीच आमच्या प्रेक्षकांमध्येही होती. कलक्षेत्रात महेश कोठारेंचं मोठं योगदान आहे.”

महेश कोठारे हे खरोखरच फायटर आहेत. मराठीमध्ये सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्यांनी ‘लो मै आ गया’ हा हिंदी चित्रपट तयार केला. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरला. त्या चित्रपटाची निर्मिती ही त्यांनी केली असल्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालं. यामध्ये त्यांना त्यांचं मुंबईतील घरही गमवावं लागलं होतं. पण तशा सगळ्या परिस्थितीतही ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन कोल्हापूरला खबरदार या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी गेले. त्यांनाही माहित होतं की मुंबईत परत आल्यावर आपल्याकडे राहायला घर नाहीये. पण त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. पुन्हा नवीन चित्रपट बनवून त्यांची निर्मिती करून ते सुपरहिट करून त्यांनी पुन्हा शून्यातून सुरुवात केली.

मराठी मनोरंजन सृष्टीत ते नेहमीच नवनवीन प्रयोग करत आले. जय मल्हार या मालिकेमध्ये त्यांनी पहिल्यांदाच व्हीएफएक्सचा वापर केला. तर त्यानंतर भारतीय मनोरंजन सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी एक नवीन प्रयोग केला. त्यांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्यांनी गणपतीला जी सोंड दाखवली ती हलणारी होती. ती दाखवण्यासाठी ही त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला. यापूर्वीच्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये गणपतीची सोंड कधीही घालत असणारी दिसलेली नव्हती. तो प्रयोग पहिल्यांदा महेश कोठारे यांनी केला. महेश कोठारे यांचा सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवासा खरोखरच प्रेरणादायी आहे. यामध्ये त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. पण त्यांनी कधीही त्यांची जिद्द, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, आणि हसत हसत प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याचा त्यांचा स्वभाव कधीही सोडला नाही. अशा या बहुगुणी अभिनेत्याला, दिग्दर्शकाला, निर्मात्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!