गेली अनेक दशकं मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असतात. १९९१ साली त्यांनी दिपक विज यांच्याशी लग्न केलं. त्यांची लव्ह स्टोरी अत्यंत रंजक आहे.

११वी ते ग्रॅज्युएशन या काळामध्ये किशोरी शहाणे यांनी जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केलं. मराठी मनोरंजन सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकलं. याच दरम्यान त्यांची ओळख दिपक विज यांच्याशी झाली.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…

आणखी वाचा : सिनेसृष्टीत मुलाला काम मिळत नसल्यानं मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली नाराजी, म्हणाली…

चित्रपट दिग्दर्शक दिपक विज ‘हप्ता बंद’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते. या चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांना सोज्वळ आणि शांत वाटेल अशी अभिनेत्री हवी होती. तर ही भूमिका एखादी मराठी अभिनेत्री उत्तमरित्या साकारु शकेल असा त्यांना विश्वास होता. त्यामुळे ते एका मराठी अभिनेत्रीच्या शोधात होते. हिंदी सिनेसृष्टीत काम करत असताना किशोरी शहाणे आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे जॅकी श्रॉफ यांनी ‘हप्ता बंद’साठी दिपक यांना किशोरी यांचं नाव सुचवलं. दिपक आणि किशोरी यांची पहिली भेट फिल्मिस्तान स्टुडीओमध्ये झाली आणि पहिल्या भेटीतच दिपक यांनी किशोरी शहाणे यांना चित्रपटासाठी फायनल केलं.

‘हप्ता बंद’च्या निमित्ताने किशोरी आणि दिपक यांची रोजच भेट होत होती. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. इतकंच नाही तर त्यांचे कुटुंबीयदेखील एकमेकांना ओळखू लागले होते. जवळपास ३ ते ४ वर्ष या दोघांमध्ये मैत्री होती. एक दिवस किशोरी यांनी अचानकपणे दिपक यांना आपण लग्न करायचं का? असा प्रश्न विचारला आणि विशेष म्हणजे दिपक यांनीदेखील त्याच क्षणी लग्नाला होकार दिला.

हेही वाचा : किशोरी आणि माझ्यातला फरक कळतो का?, रेणुका शहाणे संतापल्या

दिपक आणि किशोरी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या घरातल्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. २१ डिसेंबर १९९१ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. किशोरी यांनी दिपक यांच्या ‘हप्ता बंद’ आणि ‘बॉम्ब ब्लास्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

Story img Loader