मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. तिने आपल्या अभिनयाने या सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. क्रांती अभिनयाबरोबरच उत्तम नृत्य आणि दिग्दर्शनही करते. अशी ही सर्वगुण संपन्न आणि हरहुन्नरी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी पती समीर वानखेडे यांच्याबरोबरचे तर कधी जुळ्या मुलींचे व्हिडीओ शेअर करत आहे. पण आतापर्यंत तिने कधीही आपल्या जुळ्या मुलींचा चेहरा उघड केला नाही. त्यामुळे क्रांतीचे चाहते तिच्या जुळ्या मुलींना पाहण्यासाठी आतुरनेते वाट पाहत होते. अखेर तिच्या मुलींची पहिली झलक समोर आली आहे.
हेही वाचा – Video: ‘काव्यांजली’ मालिकेत नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ
अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या जुळ्या मुलींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये छबील आणि गोदू एकमेकींबरोबर खेळताना दिसत आहेत. तसेच दोघी एकमेकींना मिठ्ठी मारताना आणि किस्स करताना देखील पाहायला मिळत आहे. दोघींचा हा गोड व्हिडीओ शेअर करत क्रांतीने लिहीलं आहे की, “संध्याकाळची दृश्य.”
हेही वाचा – “रसिकांना खरंच मायबाप का म्हणतात ते समजतंय” अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
क्रांतीच्या मुलींचा हा व्हिडीओ पाहून कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘कसल्या गोड आहेत’, ‘तुझ्या खूप गोड मुली आहेत’, ‘आता यामधली छबील कोण आणि गोदू कोण सांगा?’, ‘या दोघींना बघायची खूप इच्छा होती. आज अखेर दोघींना बघायला मिळालं.”, “दोघी मुली पप्पांसारख्या दिसतायत”, अशा प्रतिक्रिया क्रांतीचे चाहते मंडळी देत आहेत.
हेही वाचा – Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”
दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती नुकतीच ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात झळकली होती. तिने या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती. तसेच क्रांतीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला दुसरा ‘रेनबो’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी तिने जितेंद्र जोशी आणि ऊर्मिला कोठारे अभिनीत ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.