मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व निर्माती म्हणून ओळखली जाणारी क्रांती रेडकर आपले मत नेहमीच स्पष्टपणे मांडत असते. राजकारण असो किंवा मनोरंजनसृष्टी, ती अनेकदा परखडपणे बोलताना दिसली आहे. अशाच एका मुलाखतीत क्रांतीने इंडस्ट्रीमधल्या सावळ्या मुलींबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीला अभिनेत्रींवर रंगामुळे होणाऱ्या अन्यायाबाबत प्रश्न विचारला असता, क्रांती म्हणाली, “मला खरंच असं वाटत की, हे बदलण्याची खूप गरज आहे. अनेकदा या गोष्टीसाठी मीडिया, सिनेमासृष्टी ही माध्यमं खूप कारणीभूत ठरतात. कारण- श्रीमंत मुलगी म्हणजे गोरी आणि गरीब किंवा मोलकरीण मुलगी दाखवायची झाली, तर ती काळी, सावळी दाखवली जाते. हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. टीव्ही मालिका आणि सिनेमांमुळे लोकांचा विचार बदलायला आपण मदत करतो.”

हेही वाचा… हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…”

क्रांती पुढे म्हणाली, “मी नुकतीच ‘वन डे’ नावाची एक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर बघितली. त्यात अंबिका मोडचं एमा नावाचं पात्र आहे. त्यात अंबिका आणि लिओ वुडॉल या भिन्न रंगांचे दोन कलाकार आहेत. आपल्या आशियातली अंबिका खूप सुंदर सावळी दिसतेय; तर लिओ वुडॉल हा गोऱ्या रंगाचा ब्रिटिश अभिनेता आहे. त्यात दोघांची एकत्र वावरणारी ही जोडी खूप सुंदर दिसतेय. आता या वेब सीरिजच्या निर्मात्यांनी असा कधीच विचार केला नाही की, एमा अशीच असली पाहिजे किंवा तशीच असली पाहिजे. त्यांनी यामध्ये एशियन ब्यूटीला कास्ट केलं. म्हणजे ते लोक एशियन ब्यूटीला एवढं मोठं समजतात आणि आपणच भारतीय असून, प्रतिगामी होत चाललोय. आपला जो मुख्य रंग सुंदर सावळा आहे; ज्यात स्त्रिया खरंच खूप सुंदर दिसतात. मी असं नाही म्हणत की, गोऱ्या मुलींना वाईट लेखा. त्या निश्चितच सुंदर आहेत. पण, मला तर ब्राऊन किंवा अगदी डस्की कलर खूप आवडतात. या सगळ्या बाबी आपण आपल्यात आता हळूहळू बदलायला हव्यात.”

हेही वाचा… सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; ‘या’ व्यक्तीबरोबर खास फोटो शेअर करत म्हणाली, “मला माझ्या…”

दरम्यान, क्रांती रेडकरच्या कामाबाबत सांगायचे झाले, तर क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हितेन पटेल, ऋषी सक्सेना, ऊर्मिला कोठारे, प्रसाद ओक अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar opinion on brown skintone girls in indian film industry kranti said its injustice and hypocrit dvr