अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबरोबर लग्न केलं. या जोडप्याला झिया आणि झायदा अशा दोन मुली आहेत. क्रांती तिच्या मुलींचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर त्यांचा चेहरा न दाखवता शेअर करत असते. त्या दोघींची नाव झिया-झायदा अशी असली तरीही, अभिनेत्री त्यांना प्रेमाने छबील आणि गोदो अशी हाक मारते.

हेही वाचा : सायली-अर्जुनच्या खोलीत अस्मिता लपवणार मोबाइल, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटणार? पाहा नवीन प्रोमो…

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
Amit Shah Controversy
“अमित शाहांनी राजीनामा द्यावा”, डॉ. आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर खरगेंची मागणी; काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन; मोदींकडून बचाव
pm narendra modi on amit shah dr babasaheb ambedkar congress
अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!

क्रांती रेडकरने अलीकडेच नवरात्र उत्सवानिमित्त तिच्या राहत्या घरी कन्या पूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी लहान मुलींना घरी बोलावून अभिनेत्रीने त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. नवरात्रीनिमित्त या मुलींना भरपूर खाऊ आणि गिफ्ट्स क्रांतीने दिले. या लहान मुलींची प्रेमाने विचारपूस केली. हा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : कंगना रणौतने केलं रावण दहन, ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मिळाला मान; अध्यक्षांनी सांगितलं निवडीचं कारण

क्रांतीने हा व्हिडीओ शेअर केल्यावर अनेक नेटकऱ्यांनी, “तुम्ही स्वत:च्या मुलींचे चेहरे दाखवत नाही पण, इतर मुलींचे दाखवता” अशाप्रकारच्या कमेंट्स करून अभिनेत्रीवर टीका केली. एक युजर लिहितो, “मॅडम तुम्ही स्वत:च्या मुलींचे चेहरे दाखवत नाही आणि इतर मुलींचे व्हिडीओ काढून त्यांचे चेहरे दाखवताय हा अधिकार कुणी दिला? पूर्वी व्हिडीओमध्ये स्वत:च्या मुलींचा चेहरा दाखवलेला नाही हे शोभत नाही तुम्हाला” नेटकऱ्यांच्या या टीकेला कमेंट्स सेक्शनमध्ये क्रांती रेडकरने थेट उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार, ‘निळावंती’ चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

kranti
क्रांती रेडकरने दिलं उत्तर

क्रांती नेटकऱ्यांना म्हणाली, “त्या मुलींचे आई-वडीलचं काढत होते व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी…काळजी नसावी. छबील आणि गोदोच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही घेता का?, तर मी दाखवते चेहरे…निदान व्हिडीओची भावना तरी समजून घ्या. सारखं आपलं तत्त्वज्ञान झाडू नये. सारखे नकारात्मक विचार करू नका.” दरम्यान, क्रांती आणि समीर वानखेडे यांच्या जुळ्या मुली झिया आणि झायदाचा जन्म २०१८ मध्ये झाला. सध्या त्या पाच वर्षांच्या आहेत. अभिनेत्री त्या दोघींचे अनेक किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.

Story img Loader