मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केले. क्रांती नेहमीच नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. हे दोघेही एकमेकांना १९९७ पासून ओळखतात. त्यानंतर करिअरच्या कारणास्तव दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. पुढे जवळपास ९ वर्षांनी दुबईहून येताना समीर वानखेडेंनी क्रांतीला मुंबई विमानतळावर अडवले, त्यानंतर काय घडले? त्यांची भेट कशी झाली याबाबत क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : “संघर्ष काय असतो हे मला मुंबईत…”, वैभव तत्त्ववादीने सांगितली आठवण; म्हणाला, “लोकल ट्रेनच्या गर्दीतून…”
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव आणि तिचा नवरा आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात क्रांती आणि समीर वानखेडे सहभागी झाले होते. यावेळी या दोघांना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल विचारण्यात आले. यावर क्रांतीने २०१० मध्ये घडलेला आणि कोणीही कधीच न ऐकलेला किस्सा सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “१९९७ पासून आम्ही एकमेकांना रुईया कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत असल्याने ओळखत होतो. २००१ ला कॉलेज संपल्यावर आम्ही थेट २०१० ला भेटलो. मी दुबईहून परत मुंबईला येत होते. एका पुरस्कार सोहळ्यासाठी मी तिकडे गेले होते. येताना माझ्या मित्रांनी माझ्याकडे दोन मद्याच्या बाटल्या दिल्या होत्या. मला प्रचंड भीती असते अशा काही गोष्टी आणताना पण, माझ्याकडे रितसर परवानगी होती.”
हेही वाचा : चित्रपटाचं नाव ‘सुभेदार’ का ठेवलं? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं खास कारण; म्हणाले, “इतिहासातील एकमेव…”
क्रांती रेडकर पुढे म्हणाली, “विमानतळावर सर्वत्र चेकिंग सुरु होती. त्याठिकाणी समीर वानखेडे मुख्य अधिकारी होते आणि त्यांनी मला इकडे ये अशी हाक मारली. मी प्रचंड घाबरले…या मद्याच्या बाटल्यांमुळे आता वाट लागणार अशी भीती मला वाटली. मी त्यांना अजिबात ओळखलं नव्हतं. त्यांनी मला समोरुन विचारलं, ‘तू मला ओळखलंस का?’ मी त्यांना म्हणाले, नाही…त्यानंतर ते हसले आणि मला त्यांचं कॉलेजमधील हास्य माहित होतं मी पटकन ओळखलं…त्यानंतर आमचं थोडावेळ बोलणं झालं. काहीवेळाने आम्ही एकमेकांचे नंबर घेतले आणि मी तिकडून निघाले.”
हेही वाचा : Video : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले हास्यजत्रेचे कलाकार! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
समीर वानखेडे याबद्दल सांगताना म्हणाले, “क्रांतीला मी ओळखत होतो म्हणून मी तिला थांबवलं हा भाग वेगळा पण, तिच्याकडे असणाऱ्या बॉटल्स आणि आर्टिफिशियल दागिने हे स्कॅनरमध्ये डिटेक्ट झाले होते. त्याचवेळी दुबईहून येणाऱ्या लोकांवर व्यवस्थित लक्ष ठेवण्याच्या ऑर्डर्स होत्या. मद्याच्या दोन बाटल्यांची तिच्याकडे रितसर परवानगी होती आणि आर्टिफिशियल दागिने आम्ही तपासले आणि ती निघाली. एकमेकांचे नंबर घेतल्यामुळे आम्ही काही दिवसांनी भेटलो.”