एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणी त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. समीर वानखेडेंची पत्नी व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने याबाबत एक पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रांती रेडकर समीर वानखेडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यापासूनच क्रांती सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसत आहे. आता क्रांतीने समीर वानखेडेंचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. समीर वानखेडेंनी केलेल्या कामाची झलक या व्हिडीओतून क्रांतीने दाखवली आहे.

हेही वाचा>> ट्रकने कारला धडक दिली अन्…; वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात नेमका कसा झाला? सीटबेल्ट न लावल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू?

क्रांतीने या व्हिडीओला “तू चाल पुढं” हे गाणंही दिलं आहे. समीर वानखेडेंच्या या व्हिडीओला तिने “तुम्ही तुमचा वेळ व ऊर्जा देशाची सेवा करण्यासाठी खर्ची कराल, जे तुम्ही उत्तम करता, अशी अपेक्षा आहे,” असं कॅप्शन दिलं आहे. क्रांतीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा>> “कर्नाटकचे उपमुख्यमंत्री टिपू सुलतानच्या थडग्यावर…”, डी.के.शिवकुमार यांचा फोटो पोस्ट करत शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “जेव्हा हिंदू लोक…”

समीर वानखेडे यांनी क्रांती रेडकरशी२०१७ साली लग्न केलं. क्रांतीबरोबरचा हा त्यांचा दुसरा विवाह आहे. क्रांती व समीर वानखेडे यांना दोन जुळ्या मुली आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar shared sameer wankhede video wrote post goes viral kak