दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे(Hemant Dhome) हा काही दिवसांपासून त्याच्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर या सिनेमाला ओटीटीवरदेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी व अभिनेत्री क्षिती जोग हे त्यांच्या चित्रपटाबरोबरच त्यांच्या वक्तव्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत असतात. क्षिती व हेमंत ढोमेने मुलाखतींमधून त्यांच्या लग्नाबद्दल, ते कधी प्रेमात पडले, त्यांच्या नात्याबद्दल, एकमेकांशी लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी घरी कधी सांगितले, याबद्दल वक्तव्य केले आहे. आता त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांची रोमँटिक डेट कशी असते, यावर वक्तव्य केले आहे.

कधीतरी मला त्याला…

हेमंत ढोमे व क्षिती जोग यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांची रोमँटिक डेट कशी असते, हेमंतची काय कल्पना असते यावर क्षिती जोग म्हणाली, “हेमंत मला म्हणतो, रविवारी सकाळी मी मार्केटमध्ये जातो, मासे घेऊन येतो. आपण मस्त एकत्र ते बनवू. जेवण करू. एसी लावू. मस्त काहीतरी बघत झोपून जाऊ. ही त्याची लंच डेट किंवा डिनर डेट असते. कधीतरी मला त्याला सांगावं लागतं की, मी तुला बाहेर घेऊन जाते. त्यावर त्याचं म्हणणं असतं की, बाहेर कशाला? घरात बसू, जेवण करू. त्याला बाहेर जायला आवडतं. पण, ज्याला आपण रोमँटिक डेट म्हणू ते त्याला फारसं आवडत नाही.” त्यावर हेमंतने, “रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ते म्युझिक वाजत असतं, डिस्टर्ब होतं”, असे म्हणत त्याला घरीच वेळ घालवायला आवडत असल्याचे म्हटले.

हेमंत ढोमे हा त्याच्या झिम्मा, झिम्मा २, फसक्लास दाभाडे या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. त्याआधी त्याने अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. फसक्लास दाभाडे हा चित्रपट नुकताच भेटीला आला होता. या चित्रपटात क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते. कौटुंबिक विषयावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.

आता हेमंत ढोमे व क्षिती कोणत्या प्रोजेक्टमधून आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चित्रपटाबरोबरच अभिनेता सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. हेमंत ढोमे ‘क्षणभर विश्रांती’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘हिरकणी’, ‘चोरीचा मामला’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिकांत दिसला आहे.

Story img Loader