मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. ‘झिम्मा’, ‘चोरीचा मामला’, ‘बघतोस काय मुजरा कर’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. नाटक, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. आज हेमंत त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्याची पत्नी अभिनेत्री क्षिती जोगने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांची पहिली भेट नाटकाच्या सेटवर झाली होती. यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं. आज नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त क्षितीने खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : सारा अली खानच्या चित्रपटात झळकला ‘देवयानी’ फेम अभिनेता; फोटो पाहून मराठी कलाकारांनी केलं कौतुक

“नेहमीच चांगल्या कथा ऐकवत राहा…स्वप्न पाहत राहा, कष्ट कर, हसत राहा आणि स्वत:वर कायम विश्वास ठेव…वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर…Happy Birthday पाटील.” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने हेमंत ढोमेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टबरोबर क्षितीने त्यांच्या दोघांचा एक रोमँटिक फोटो देखील शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : ‘चोली के पीछे क्या है…’, माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक गाण्यावर करीना कपूरचा ग्लॅमरस अंदाज, ३१ वर्षांनी बनवलं रिमिक्स

दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातून हेमंतवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. वैयक्तिक आयुष्यात २०१२ साली हेमंत-क्षितीने लग्नगाठ बांधली. दोघांच्या सुखी संसाराला काही दिवसांआधीच ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kshitee jog special post for husband hemant dhome on the occasion of his birthday sva 00