Kshiti Jog Birthday : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षिती जोगला ओळखलं जातं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने क्षितीने कायमच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गेल्या काही वर्षात तिला मराठी कलाविश्वातील यशस्वी निर्माती म्हणून देखील ओळखलं जातं. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘सनी’ या चित्रपटांची निर्मिती तिने केलेली आहे.
क्षिती जोग आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय क्षितीचा नवरा हेमंत ढोमेने सुद्धा बायकोसाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांची पहिली भेट नाटकाच्या सेटवर झाली होती. यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं. हेमंतने क्षितीच्या वाढदिवशी नेमकी काय पोस्ट केलीये पाहूयात…
हेमंतने क्षितीबरोबर Twinning फोटो शेअर करत या वाढदिवसाच्या पोस्टला हटके कॅप्शन दिलं आहे. “पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर काही मजाच आली नसती! बाकी आपलं सेलिब्रेशन तर थांबतच नसतं, हॅपीवाला बर्थडे माय लव्ह” अशी पोस्ट शेअर करत हेमंतने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
हेमंतप्रमाणे चैत्राली गुप्ते, सिद्धार्थ चांदेकर, अमित फाळके, हरीश दुधाडे यांसह अनेक कलाकारांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय अभिनेत्रीची निर्मिती संस्था ‘चलचित्रमंडळी’ यांनी “चलचित्र मंडळीच्या मालकीणबाई, पॉझिटिव्ह एनर्जीच्या पावरहाऊस…माननीय क्षिती जोग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशी हटके पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : “४ – ५ हिट सिनेमे दिल्याने हे बॉलीवूडचे बाप होणार नाहीत”, दाक्षिणात्य निर्मात्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला दिग्दर्शक; नेमकं काय घडलं?
दरम्यान, क्षिती जोगच्या ( Kshiti Jog ) आगामी कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिची महत्त्वाची भूमिका असलेला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोगसह सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.