अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना काही अभिनेत्रींची नावं घेतली. ज्यामध्ये प्राजक्ता माळीचं नावं होतं. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात २८ डिसेंबरला प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तसंच यावेळी अभिनेत्रीने सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. याच प्रकरणावरून मराठी कलाकार प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी एकवटले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर निषेध नोंदवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता कुशल बद्रिकेने प्राजक्ता माळीच्या प्रकरणासंदर्भात नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. “जाहीर निषेध” असं लिहिलेला फोटो शेअर करत कुशलने कॅप्शनमध्ये लिहिलं, “कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा तीन-चार वेळा परळीला गेलोय…काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही…वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र काळजात ‘धस’ होतंय, कुणाचं ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध…प्राजक्ता मी तुझ्याबरोबर आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 18: ईशा सिंह १५ वर्षांनी मोठा असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट? सलमान खानने नाव घेताच लाजली, म्हणाली, “तो माझा…”

हेही वाचा – Video: नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, ‘या’ ठिकाणी सुरू केलं रेस्टॉरंट

याशिवाय, अभिनेत्री विशाखा सुभेदारने प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं की, प्राजक्ता माळी…मी तुझ्याबरोबर आहे…आपल्या जीवावर भाषण करावी…दुसऱ्याचं नाव गुंफण विनाकारण हे माणुसकीला धरून अजिबातच नाही. मी निषेध करते या वाक्याचा. प्राजक्ता माळी माझा तुला पाठिंबा आहे.

हेही वाचा – “ही विकृती आहे…” म्हणत लोकप्रिय निर्माते नितीन वैद्य यांनी प्राजक्ता माळीला दिला पाठिंबा; म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारणी आणि…”

दरम्यान, याप्रकरणावरून प्राजक्ता माळी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. यावेळी सुरेश धस यांनी केलेले आरोप याची वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडून कठोर कारवाई करण्याची मागणी असल्याचं प्राजक्ताने पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राजक्ताने दिली. याशिवाय करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर देखील अभिनेत्रीने आपलं मत मांडलं. “तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते”, असं प्राजक्ता म्हणाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kushal badrike and vishakha subhedar share post on prajakta mali controversy pps