अभिनेता कुशल बद्रिकेने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याने आपल्या सहजसुंदर अभिनय आणि विनोदी शैलीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत वेगळी छाप उमटवली आहे. त्यामुळे कुशलचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. अभिनेत्याने नुकतीच बायको सुनयना बद्रिके हिच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता कुशल बद्रिकेने बायकोबरोबर काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिल आहे, “संसार म्हटलं की व्यवहार आला आणि व्यवहार म्हटलं की हिशोब… आता हिशोब लावला, “तुझ्या-माझ्या” नात्याचा. बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी…आपल्या पहिल्या घराचं बुकिंग करण्यासाठी तुझी एकमेव असलेली पॉलिसी मोडली होती आपण, आता पुन्हा नवीन घर घेता येईल, पण ती “ती वेळ” परत करण्याची पॉलिसी अजून कोणत्याच कंपनीकडे नाही बघ.”

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा – Video: आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीला सावत्र आई किरण राव गैरहजर, आमिर खान कारण सांगत म्हणाला…

“एका दसऱ्याला ‘झेंडूची फूलं’ परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लाऊन साजरा केलेला दसरा आठवतोय. आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू? सांग…अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं, संक्रांतीला काळी साडी नेसायची अशा सगळ्या “प्रथा” माहीत होत्या तुला, पण तुझा अवघा जन्म माझ्या ‘व्यथा’ जपण्यात गेला यार… आता परवा परवाचीच गोष्ट नाही का? मानसिक आरोग्याच्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठीवरून हाथ फिरवत बसली होतीस…ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करू शकणार आहे मी? माझ्यासाठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची परतफेड करता येणार नाही मला. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवां पलिकडे काहीही देता येणार नाही मला. सॉरी आणि वाढदिवसाच्या (सुकून)”

हेही वाचा – Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबरोबर रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल

कुशलच्या या पोस्टवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी त्याच्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. अनेकदा तो पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Story img Loader